
मुंबई : सहाय्यक पोलीस निरीक्षण सचिन वाझे (Sachin Vaze) याला एनआयएने अटक केल्यानंतर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी दिसून येत आहे. सचिन वाझे यांच्या अटकेनंतर मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेले स्फोटके आणि मनसुख हिरेन (Mansukh Hiren) प्रकरणाचा संबंध शिवसेनेच्या काही मंत्र्यांशी जोडला जात आहे. यावरुन विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरु केले आहे. तसेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणीही केली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर आज गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी तातडीने दिल्ली गाठून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांची भेट घेतल्याची माहिती पुढे आली आहे. त्यांच्या अचानक भेटीमुळे चर्चेचे पेव फुटले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहा जनपथ या दिल्लीतील बंगल्यावर अनिल देशमुख सकाळी दहा वाजताच्या सुमारास दाखल झाले. शरद पवार अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सध्या राजधानी दिल्लीत आहेत. संसदेतून परतल्यानंतर शरद पवारांची अनिल देशमुखांनी भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र असे असे असले तरी गृहमंत्र्यांनी थेट दिल्ली गाठून पवारांची तात्काळ भेट घेणे म्हणजे पडद्यामागे काहीतरी शिजतेय असं बोलल जात आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला