वायू प्रदुषणाच्या मुद्द्यावर दिल्ली सरकारचा निर्णय

arvind kejriwal

नवी दिल्ली : दिल्लीतील सत्ताधारी ‘आम आदमी पक्षा’च्या सरकारने वायू प्रदुषणाच्या मुद्द्यावर मोठा निर्णय घेतला आहे. दिल्ली सरकारमधील प्रत्येक वाहन हे येत्या सहा महिन्यात इलेक्ट्रीक असेल, अशी घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. त्याचबरोबर, सामान्य नागरिकांनीही हे वाहन वापरावे म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी अभियानाची सुरुवात केजरीवाल यांनी केली आहे.

एकूण शंभर चार्जिंग स्टेशन तयार करण्यासाठी दिल्ली सरकारकडून टेंडर काढली जात आहे. असे केजरीवाल यांनी जाहीर केले. दिल्लीत आतापर्यंत सहा हजार इलेक्ट्रीक वाहनांची विक्री झाली आहे. यासाठी खरेदीदारांना सब्सिडी देण्यात आली आहे. इलेक्ट्रीक वाहनाचे जनआंदोलन व्हायला हवे. तरच प्रदुषणातून दिल्लीकरांना मुक्ती मिळू शकते. यासंदर्भात सरकार जनजागृती मोहीम हाती घेत आहे. या वाहन निर्मितीसाठी देशातील मोठ्या कार निर्मात्या कंपन्यांनीही पुढाकार घ्यायला हवा. सोबतच देशातील युवा वाहन खरेदी करेल तेव्हा त्यांनी इलेक्ट्रीक वाहन खरेदी करायला हवे, असे केजरीवाल यांनी सांगितले. केजरीवाल यांच्या म्हणण्यानुसार, दुचाकी आणि तीनचाकी इलेक्ट्रीक वाहन खरेदीवर सरकार ३० हजारांपर्यंत, तर चारचाकी इलेक्ट्रीक वाहन खरेदीवर १.५ लाखांची सब्सिडी देत आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रीक वाहन खरेदी करताना खरेदीदाराला कोणताही रोड टॅक्स आणि नोंदणी शुल्क भरावे लागणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER