दिल्लीला मिळाले नवीन पोलिस आयुक्त, हिंसाचारात आतापर्यंत ४२ बळी

Delhi gets new police chief

नवी दिल्ली : हिंसाचाराने होरपळलेल्या दिल्लीच्या पोलिस आयुक्तपदी एस. एन श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने आज शुक्रवारी ही नियुक्ती केली आहे. सध्याचे आयुक्त अमूल्य पटनाईक यांची मुदत उद्या २९ फेब्रुवारी रोजी संपत असून, त्यांच्या जागी श्रीवास्तव यांची नेमणूक करण्यात आली आहे.

कोण म्हणते अर्थव्यवस्था कोसळली? असे असते तर लग्नाचे हॉल व हॉटेल फुल्ल असते का? : रेल्वे राज्यमंत्र्यांचा दावा

श्रीवास्तव हे १८८५च्या आयपीएस तुकडीचे अधिकारी असून, सध्या त्यांच्याकडे दिल्लीच्या कायदा आणि सुव्यव्स्थेबाबत विशेष पोलिस आयुक्तपदाचीही जबाबदारी आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलातून (सीआरपीएफ) केंद्रीय गृह मंत्रालयाने श्रीवास्तव यांना दिल्लीच्या विशेष पोलिस आयुक्तपदाची जबाबदारी नुकतीच दिलेली आहे.

दरम्यान, नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून दिल्लीमध्ये उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत ४२ जणांचा बळी गेला आहे. सर्वाधिक बळीसंख्या ईशान्य दिल्लीतील आहे.