दिल्ली : इस्रायलीच्या दूतावासाजवळ स्फोट; हाय अलर्ट जारी

Explosion near Israeli embassy

नवी दिल्ली :- दिल्ली येथील इस्रायली दूतावासाजवळ आज सायंकाळी ६ वाजताच्या सुमाराला स्फोट झाला. यानंतर सर्व विमानतळ, महत्त्वाची ठिकाणे व सरकारी इमारतींसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून या ठिकाणांवरील सुरक्षा वाढवली असून सुरक्षा सर्व उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. प्राथमिक माहितीनुसार, हा कमी क्षमतेचा स्फोट आहे. तीन-चार वाहनांचे काच फुटलेत. स्फोटात जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. सुरक्षा यंत्रणा तपास करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER