अरविंद केजरीवालांचे उद्धव ठाकरेंच्या पावलावर पाऊल ; दिल्लीत आठवडाभर लॉकडाऊन

Arvind Kejriwal and uddhav thackeray

मुंबई : देशात कोरोनाने थैमान (Corona Virus) घातले आहे. दिल्लीतही कोरोनाची चौथी लाट आली आहे. नवी दिल्लीतील आरोग्य यंत्रणा कोलमडली नाही; मात्र, आरोग्य यंत्रणेच्या क्षमतेएवढे रुग्ण आढळत आहेत. या परिस्थितीमुळं नवी दिल्लीमध्ये पुढील आठवडाभर लॉकडाऊन (Lockdown) लावण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांना त्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. या निर्णयानंतर केजरीवालांनी उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) पावलावर पाऊल टाकल्याच्या चर्चा होत आहेत.

अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या चौथ्या लाटेला तोंड देत आहे. राज्यात २५ हजार कोरोना रुग्ण आढळत आहेत. ही रुग्णसंख्या आणि दिल्लीची आरोग्य यंत्रणा जवळपास सारखी आहे. यामुळं यंत्रणेवर ताण आला आहे. सरकारकडून आरोग्य यंत्रणा कोलमडली जाऊ नये यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत, असं अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) म्हणाले.

केजरीवाल यांनी पुढील सहा दिवसांत आरोग्य यंत्रणा बळकट करणार असल्याचे सांगितले. येत्या सहा दिवसांत बेडची संख्या वाढवली जाईल. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये ऑक्सिजन, औषधे यांची व्यवस्था करणार आहोत. सर्व दिल्लीकरांनी २६ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनमध्ये सहकार्य करावे. दिल्लीला सहकार्य केल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार, असेही केजरीवाल म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button