IPL 2020: दिल्ली कॅपिटल्सचा प्रचंड विजय, एकतर्फी सामन्यात राजस्थान रॉयल्सचा केला पराभव

Delhi Capitals vs Rajasthan Royals

आयपीएलच्या १३ व्या सत्रातील २३ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) राजस्थान रॉयल्सला (Rajasthan Royals) ४६ धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले. शारजाह येथे खेळल्या गेलेल्या एकतर्फी सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने निर्धारित २० षटकांत आठ गडी गमावून १८४ धावा केल्या. या मोसमातील ही पहिली वेळ आहे जेव्हा शारजाहमधील कोणताही संघ प्रथम फलंदाजी करत २०० धावांचा टप्पा पार करू शकला नाही, त्याला उत्तर देताना राजस्थान संघ १९.४ षटकांत १३८ धावांवर सर्वबाद झाला. वरुण आरोन बाद झालेला शेवटचा फलंदाज होता, ज्याचा बळी रबाडाने घेतला.

दिल्लीने शारजाहमध्ये मोसमातील सर्वात कमी धावा वाचवले
या मोसमातील प्रथमच वेळ आहे जेव्हा शारजाहमधील संघ प्रथम फलंदाजी करताना २०० चा आकडा पार करू शकला नाही. दिल्लीला १८४ धावांनी रोखूनही राजस्थान हे लक्ष्य गाठू शकला नाही आणि दिल्लीच्या गोलंदाजांनी हे लक्ष्य चांगल्या प्रकारे वाचवले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER