दिल्ली कॅपिटल्सचीही कोरोना लढ्यासाठी दीड कोटी रुपयांची मदत

Delhi Capitals Donate 1.5 Crore

राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) पाठोपाठ दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि त्यांचे प्रवर्तक जे.एस.डब्ल्यू. फाउंडेशन (JSW Foundation) व जीएमआर वरलक्ष्मी फाउंडेशन (GMR Varlakshmi foundation) यांनी दिल्ली एनसीआर भागातील स्वयंसेवी संस्थांना दीड कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य करण्याची घोषणा केली आहे. हेमकंत फाउंडेशन आणि उदय फाउंडेशन या संस्थांना ते ही मदत करणार आहेत. दिल्ली कॅपिटल्सने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही घोषणा केली आहे.

ही रक्कम कोरोनाग्रस्तांसाठी ऑक्सिजन सिलिंडर व काॕन्सन्ट्रेटर, वेलनेस कीट अशा आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यासाठी वापरली जाणार आहे.

दिल्ली कॅपिटल्सच्या आधी बुधवारीच राजस्थान रॉयल्सचे प्रवर्तक, खेळाडू व संघ व्यवस्थापनाने मिळून साडेसात कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. विशेष म्हणजे दोन्ही संघांनी कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठीची ही रक्कम स्वयंसेवी संस्थांना देण्याची घोषणा केली आहे. राजस्थान रॉयल्सने त्यांची समाजकार्य शाखा रॉयल राजस्थान फाउंडेशन (RPF) आणि ब्रिटिश एशियन ट्रस्ट (BAT) यांच्या माध्यमातून कोरोनाग्रस्तांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button