दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा केला १३ धावांनी पराभव

Delhi Capitals beat Rajasthan Royals by 13 runs

दुबईत खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग २०२० च्या ३०० व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने बुधवारी राजस्थान रॉयल्ससमोर विजयासाठी १६२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने राजस्थान रॉयल्सविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि निर्धारित २० षटकांत सात गडी गमावून १६१ धावा केल्या.

राजस्थान रॉयल्सने लक्ष्याचा पाठलाग करताना निर्धारित २० षटकांत आठ गडी गमावून १४८ धावा करू शकले आणि सामना १३ धावांनी गमावला. दिल्ली कॅपिटल्सने या स्पर्धेत आतापर्यंत आठ सामने खेळले आहेत, त्यापैकी सहा सामन्यात विजयी आणि दोन सामने गमावले आहेत. अशा प्रकारे, १२ गुणांसह दिल्ली प्रथम स्थानावर आली आहे. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सनेही आतापर्यंत आठ सामने खेळले असून त्यापैकी केवळ तीनमध्ये विजयाची चव चाखली असून पाच सामन्यात पराभव झाला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये राजस्थान सध्या ६ गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER