दिल्ली बॉम्बस्फोट : स्फोटकांचे पाकीट मोटारीतून फेकले होते

Delhi Bomb Blast

नवी दिल्ली : इस्त्रायलच्या दूतावासाजवळ झालेल्या स्फोटातील स्फोटके एका कारमधून फेकण्यात आली होती, असे प्राथमिक चौकशीत लक्षात आले आहे.

हा स्फोट सायंकाळी ५ वाजेच्या सुमाराला इस्त्रायल दूतावासापासून १५० मीटर दूर झाला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या चित्रणातून लक्षात आले की, स्फोटाच्या ठिकाणी धावत्या कारमधून एक पाकीट फेकण्यात आले, ते रस्त्यावर झाडांजवळ पडले आणि काही वेळात स्फोट झाला.

एका वृत्त वाहिनीने म्हटले आहे की, स्फोटासाठी वापरण्यात आलेलं सामान दिल्लीतील लोकल मार्केटमधून खरेदी करण्यात आले होते. कारवर बॉल बेअरिंगचे निशाण सापडले आहे. याच्या आधारावर बॉम्ब तयार करण्याचं साहित्य दिल्लीतून खरेदी करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा IED ब्लास्ट होता, मात्र स्फोटाची तीव्रता खूप कमी होती. म्हणजे यामध्ये ज्या विस्फोटकांचा वापर केला होता, त्याचं प्रमाण वा त्याची इंटेसिंटी जास्त नव्हती. गृहमंत्री अमित शहा यांना स्फोटाबाबत माहिती देण्यात आली आहे.

विजय चौकपासून दोन किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर हा बॉम्ब स्फोट झाला. स्फोट झाला त्यावेळी विजय चौकवर ‘बिटिंग रिट्रिट’ सोहळा सुरू होता व राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य वरिष्ठ सदस्य उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER