IPL 2020ः पृथ्वी शॉचा अर्धशतक, दिल्लीने सलग दुसरा विजय मिळवत चेन्नईचा ४४ धावांनी पराभव केला

दिल्लीचा सलग दुसरा विजय चेन्नईला ४४ धावांनी पराभूत केले

Chennai vs Delhi

आयपीएलच्या १३ व्या सत्रात दिल्ली संघाने विजयी ताल कायम राखला आहे. शुक्रवारी दुबईत खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या सातव्या सामन्यात पृथ्वी शॉ (६४) च्या शानदार अर्धशतकाच्या खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटलने चेन्नई सुपर किंग्जला ४४ धावांनी पराभूत केले. या मोसमात दिल्लीचा हा सलग दुसरा विजय आहे. या सामन्यात दिल्लीने प्रथम नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि चेन्नईसमोर विजयासाठी १७६ धावांचे लक्ष्य ठेवले. निर्धारित षटकांत दिल्लीने तीन गडी गमावून १७५ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल चेन्नईचा संघ सात विकेट गमावल्यानंतर १३१ धावा करु शकला आणि सामना गमावला.

ही बातमी पण वाचा : धोनी एकचं मन कितीदा जिंकणार ? आकाशात उडी मारून धोनीने घेतली ही कॅच

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER