अव्वल स्थानी येण्यासाठी दिल्ली आणि बंगळुरू यांच्यात होणार चुरशीचा सामना

Delhi Capitals - Royal Challengers Bangalore

दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची (Royal Challengers Bangalore) टीम आज दुबईमध्ये समोरासमोर येईल. दोन्ही संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत आणि आतापर्यंत चारपैकी तीन सामन्यांमध्ये विजय मिळविला आहे. गुणांच्या टेबलमध्येही दोन्ही संघ अनुक्रमे दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकावर आहेत. आजच्या सामन्यात, जो संघ जिंकेल तो सर्वोच्च स्थान गाठेल.

रॉयल चैलेंजर्स बैंगलोर (RCB) :
शेवटच्या सामन्यात संघाने चमकदार कामगिरी करत राजस्थानविरुद्ध मोठा विजय मिळविला. अशा परिस्थितीत संघात क्वचितच बदल पाहायला मिळेल. पुन्हा एकदा देवदत्त पडिकक्कल आणि आरोन फिंच सलामीला जाताना दिसू शकतात. मधल्या फळीत विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, गुरकीरत मान दिसू शकतात. गोलंदाजीत नवदीप सैनी, युजवेंद्र चहल, इसुरु उडाना, एडम जम्पा हेदेखील खेळण्याची अपेक्षा आहे.

फलंदाज: देवदत्त पडीक्कल, आरोन फिंच, विराट कोहली
यष्टीरक्षक: एबी डिविलियर्स
अष्टपैलू: शिवम दुबे, वाशिंगटन सुंदर, गुरकीरत मान
गोलंदाज: नवदीप सैनी, युजवेंद्र चहल, इसुरु उडाना, एडम जम्पा

दिल्ली कैपिटल्स (DC) :
मागील सामन्यात दिल्लीच्या फलंदाजांनी चमकदार कामगिरी करत केकेआरविरुद्ध विजय मिळवला होता. अशा परिस्थितीत क्वचितच मोठे बदलाव पाहायला मिळेल. शिखर धवन आणि पृथ्वी शॉ पुन्हा संघासाठी डाव सुरू करताना दिसू शकतात. मधल्या फळीत श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, मार्कस स्टोइनिस, शिमरोन हेटमेयर, हर्षल पटेल हे मैदानात उतरू शकतात. गोलंदाजी विभागात एनरिच नोर्त्जे, कगिसो रबाडा, अमित मिश्रा आणि रविचंद्रन अश्विन यांना पुन्हा संधी मिळू शकेल.

फलंदाज: शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, शिमरोन हेटमेयर
यष्टीरक्षक: ऋषभ पंत
अष्टपैलू: मार्कस स्टोइनिस, हर्षल पटेल
गोलंदाज: एनरिच नोर्त्जे, कागिसो रबाडा, अमित मिश्रा, रविचंद्रन अश्विन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER