राज्य सरकार लस प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो हटवणार का? नवाब मलिक म्हणाले…

मुंबई : राज्यात एकीकडे कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. तर दुसरीकडे कोरोना लसीचा (Corona Vaccine) मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच कोविन ॲपवर (Cowin app) नोंदणी करतानादेखील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, यासंबंधी राज्याला स्वतंत्र लसीकरण नोंदणी करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र सरकारतर्फे करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचा प्रमाणपत्रावर असलेला फोटो हटवणार नाही, असे आश्वासन दिले आहे. केंद्र सरकारला वाटत असेल की, आम्ही लसीच्या प्रमाणपत्रावरील पंतप्रधानांचा फोटो काढून टाकू; पण आम्ही तसे करणार नाही, असे मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

ॲपवर नोंदणी करत असताना नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच नोंदणी करण्यासाठी नागरिकांना ॲप डाऊन होत नसल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर ॲप तयार करण्याची परवानगी राज्य शासनाला द्यावी, अशी मागणी केंद्राकडे वारंवार करत असल्याचेही नवाब मलिक यांनी यावेळी बोलून दाखवले.

लसीकरण केल्यानंतर मिळणाऱ्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो तसाच राहणार असल्याचं अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच आम्हाला स्वतंत्र ॲप तयार करण्याची परवानगी आम्ही वारंवार मागत आहोत. पण केंद्र सरकारतर्फे अशी परवानगी अद्यापपर्यंत मिळाली नाही, असेही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button