शहरातील टपऱ्या हटवण्यासाठी नगर प्रशासनाला भाग पाडा – अ‍ॅड. दीपक पटवर्धन

Deepak Patwardhan

रत्नागिरी(प्रतिनिधी): टपऱ्यांमुळे रत्नागिरी शहर बकाल बनत चाललं आहे. या अनधिकृत टपऱ्यांमुळे नागरिकांना अनेक अडचणी सोसाव्या लागत आहेत. त्यामुळे या टपऱ्या तात्काळ हटवण्यासाठी भाजपच्या नगरसेेेवकानी नगर परिषदेत आक्रमक भूमिका घ्यावी असा सज्जड आदेश भाजपा जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी भाजप नगरसेवकांना दिला.

रत्नागिरी नगर परिषदेच्या काल झालेल्या सर्वसाधारण सभेसंदर्भाने आढावा घेताना अ‍ॅड. पटवर्धन यांनी नगरसेवकांना अशा सूचना दिल्या. नगरपरिषदेत काल मनमानी पद्धतीने मंजूर केलेल्या ‘तारांगण’ या विषयावर जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागा असे आदेश पटवर्धन यांनी नगरसेवकांना दिले.

सर्व भाजप नगरसेवकांना लवकरच एक आचारसंहिता ठरवून देऊ असे पटवर्धन म्हणाले. नगरसेवकांनी जनतेच्या प्रश्नावर पाठपुरावा करत आक्रमक भूमिका घ्यावी, पार्टी याबाबत नगरसेवकांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील असा आश्वासक पाठिंबा नगरसेवकाना देण्यात आला. रत्नागिरी शहरातील पाणी पुरवठा, रस्ते, ड्रेनेज आदी नागरी सुविधा बाबत आग्रही सजग राहून काम करण्याचे धोरण ठरवण्यात आले.