दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करा; सरकारची सीबीएसई आणि आयसीएसईला विनंती

Defer Class 10, 12 exams planned in July, state tells CBSE, ICSE 

मुंबई :- सीबीएसई आणि आयसीएसईने दहावी-बारावीच्या  नियोजित परीक्षा घेऊ नये. विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकला किंवा त्यांच्या वर्षभरातील अंतरिम परीक्षांच्या गुणांची सरासरी त्यांना गुण द्या, अशी विनंती महाराष्ट्र सरकारने केली आहे. सरकारच्या या पत्रामुळे राज्यातील सीबीएसई आणि आयसीएसईच्या विध्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

परीक्षेसंबंधी अडचणींची माहिती देताना सरकारने म्हटले आहे की – कोरोनाच्या साथीमुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा, केंद्रांपर्यंत जाणे आणि परीक्षांचे आयोजन करणे, या दोन्ही गोष्टी आरोग्याच्या दृष्टीने घातक आहेत.

सरकारने दोन्ही मंडळांकडे  दहावी-बारावीच्या  परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती मागितली आहे. दोन्ही मंडळांच्या प्रमुखांशी सरकार उद्या, ६ जून रोजी आभासी बैठक ( virtual meeting ) घेणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER