मदन शर्मा यांची संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केली विचारपूस

Madan singh-Rajnath singh

दिल्ली : शिवसैनिकांनी मारहाण केलेले नौदलाचे माजी अधिकारी मदन शर्मा (Madan Sharma) यांना फोन करून संरक्षण मंत्री राजनाथ सिंग (Rajnath Singh) यांनी त्यांची विचारपूस केली. ही घटना निंदनीय आहे, असे ते म्हणाले. लवकर बरे व्हा, अशी सदिच्छा व्यक्त केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे एक कार्टून मदन शर्मा यांनी ‘फॉरवर्ड’ (Forward) केल्याच्या कारणावरून शिवसैनिकांनी काल शर्मा यांना त्यांच्या घरी जाऊन त्यांना मारहाण केली होती. या मारहाण प्रकरणी अटक करण्यात आलेल्या शिवसैनिकांची लगेच आज सुटकाही करण्यात आली !

शिवसैनिकांच्या सुटकेविरुद्ध भारतीय जनता पार्टीने (BJP) मुंबईच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या कार्यालयासमोर निदर्शन केली. शर्मा यांची कन्या शीला यांनी पण या निदर्शनात भाग घेतला. त्या म्हणाल्या – शिवसैनिकांनी वरिष्ठ नागरिकांवर हल्ला केला आहे. या आरोपींना कोणत्या कलमात अटक करायची हे पोलिसांना कळले पाहिजे. आरोपींना हत्येच्या आरोपात अटक झाली पाहिजे. जमानत मिळायला नको.

मदन शर्मा एएनआय वृत्त संस्थेशी बोलताना म्हणाले की, आमच्या देशात सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. व्हॅट्सऍप लोकांशी संपर्क करण्याचे माध्यम आहे. कोणताही संदेश कुठून निर्माण होतो याचा शोध घेण्याचा उपाय शोधला पाहिजे.

महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही शर्मा यांच्यावरचा हल्ल्याचा ‘राज्य पुरस्कृत दहशतवादाची स्थिती’ म्हणून निषेध केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER