महिला टेनिसमध्ये विजेतेपदाचे रक्षण करणे एवढे कठीण आहे का?

defending title is difficult in women tennis

महिला टेनिसमध्ये (Women’s Tennis) दरवेळी वेगळी ग्रँड स्लॅम स्पर्धा विजेती समोर येण्याची मालिका सुरुच राहणार आहे. यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये गतविजेती अमेरिकन सोफिया केनिन (Sofia Kenin) दुसऱ्याच फेरीत पराभूत झाली आहे. त्यामुळे 2016 च्या विम्बल्डननंतर एकही ग्रँड स्लॅम स्पर्धा विजेती पुढल्या वर्षी आपला किताब राखू शकलेली नाही. विजेतेपद कायम राखणे तर दूरच..पण पुढच्या वर्षी कोणती गतविजेती अंतिम फेरीसुध्दा गाठू शकलेली नाही.

ताजे उदाहरण सोफिया केनिनचे आहे. ही अमेरिकन खेळाडू गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये अजिंक्य ठरली होती पण यंदा तिचे आव्हान दुसऱ्याच फेरीत संपले. एस्टोनियाच्या केया कानेपी (Kaia Kaneipi) हिने तिला दुसऱ्याच फेरीत 6-3, 6-2 असा पराभवाचा धक्का दिला. त्यामुळे महिला टेनिसमध्ये विजेतेपदाचे रक्षण करणे एवढे कठीण आहे का, असा प्रश्न पडला आहे.

2016 मध्ये सेरेना विल्यम्सने (Serena Williams) आपले विम्बल्डन विजेतेपद कायम राखले होते. त्यानंतर कोणतीही महिला टेनिसपटू सलग दुसऱ्या वर्षी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकू शकलेली नाही. त्यामुळे ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणे सोपे पण तो किताब कायम राखणे कठीण असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या 20 ग्रँड स्लॅम स्पर्धांचा विचार केला तर महिला टेनिसने ग्रँड स्लॅम स्पर्धा पहिल्यांदाच जिंकणाऱ्या 12 खेळाडू पाहिल्या आहेत. यापैकी कुणीही पुढल्या वर्षी तीच स्पर्धा पुन्हा जिंकू शकलेली नाही. त्याआनी भलेही इतर स्पर्धा जिंकल्या असतील पण तीच स्पर्धा सलग दुसऱ्या वर्षी कुणीही जिंकू शकलेले नाही.

सेरेना विल्यम्सने 2015 मध्ये विम्बल्डन विजेतेपद पटकावल्यावर पुन्हा 2016 मध्ये ती विम्बल्डन विजेती होती. 2017 मध्ये बाळंतपणामुळे ती खेळली नव्हती पण सेरेना आई बनल्यापासून महिला टेनिसवर कुण्या एका खेळाडूचे वर्चस्व गाजवण्याचे दिवस संपले आहेत. सेरेनाशिवाय अशी खेळाडू शोधली तर ती व्हिक्टोरिया अझारेंका आहे जिने ऑस्ट्रेलियन ओपनचे आपले विजेतेपद 2013 मध्ये कायम राखले होते.

महिला टेनिसमधील ग्रँड स्लॅम स्पर्धा विजेत्यांची पुढील वर्षी त्याच स्पर्धेत कामगिरी कशी राहिली ते बघू या…

2015- विम्बल्डन- सेरेना विल्यम्स – विजेती
2016- विम्बल्डन- सेरेना विल्यम्स – विजेती
2017- विम्बल्डन- सेरेना विल्यम्स- खेळली नाही

2015- युएस.ओपन- फ्लेव्हिया पेनेटा- विजेती
2016- युएस.ओपन- फ्लेव्हिया पेनेटा- निवृत्त

2016- ऑस्ट्रेलियन ओपन- अँजेलिक कर्बर- विजेती
2017- ऑस्ट्रेलियन ओपन- अँजेलिक कर्बर- पराभव- चौथी फेरी

2016- फ्रेंच ओपन- गर्बाईन मुगुरुझा- विजेती
2017- फ्रेंच ओपन- गर्बाईन मुगुरुझा- पराभव- चौथी फेरी

2016- युएस ओपन- अँजालीक कर्बर- विजेती
2017- युएस ओपन- अँजालीक कर्बर- पराभव- पहिली फेरी

2017- ऑस्ट्रेलियन ओपन- सेरेना विल्यम्स- विजेती
2018- ऑस्ट्रेलियन ओपन- सेरेना विल्यम्स- खेळली नाही

2017- फ्रेंच ओपन- येलेना ओस्टापेंको- विजेती
2018- फ्रेंच ओपन- येलेना ओस्टापेंको- पराभव- पहिली फेरी

2017- विम्बल्डन- गर्बाईन मुगुरुझा- विजेती
2018- विम्बल्डन- गर्बाईन मुगुरुझा- पराभव- दुसरी फेरी

2017- युएस. ओपन- स्लोन स्टिफन्स- विजेती
2018- युएस. ओपन- स्लोन स्टिफन्स- पराभव- क्वार्टर फायनल

2018- ऑस्ट्रेलियन ओपन- कॕरोलीन वोझ्नियाकी- विजेती
2019- ऑस्ट्रेलियन ओपन- कॕरोलीन वोझ्नियाकी- पराभव- तिसरी फेरी

2018- फ्रेंच ओपन- सिमोना हालेप- विजेती
2019- फ्रेंच ओपन- सिमोना हालेप- पराभव- क्वार्टर फायनल

2018- विम्बल्डन- अँजेलिक कर्बर – विजेती
2019- विम्बल्डन- अँजेलिक कर्बर- पराभव- दुसरी फेरी

2018- युएस ओपन- नाओमी ओसाका- विजेती
2019- युएस ओपन- नाओमी ओसाका – पराभव- चौथी फेरी

2019- ऑस्ट्रेलियन ओपन- नाओमी ओसाका- विजेती
2020- ऑस्ट्रेलियन ओपन- नाओमी ओसाका- पराभव- तिसरी फेरी

2019- फ्रेंच ओपन- अॕशली बार्टी- विजेती
2020- फ्रेंच ओपन- अॕशली बार्टी- कोरोनामुळे सहभाग नाही

2019- विम्बल्डन- सिमोना हालेप- विजेती
2020- विम्बल्डन- सिमोना हालेप- कोरोनामुळे स्पर्धाच रद्द

2019- युएस ओपन- बियांका आंद्रेस्कू – विजेती
2020- युएस ओपन- बियांका आंद्रेस्कू- दुखापतीमुळे सहभाग नाही

2020- ऑस्ट्रेलियन ओपन- सोफिया केनिन- विजेती
2021- ऑस्ट्रेलियन ओपन- सोफिया केनिन- पराभव- दुसरी फेरी

आता ह्या अशा अपयशामागचे कारण कदाचित विजेतेपदानंतर वाढलेल्या अपेक्षांचे दडपण असू शकते असे सोफिया केनिनने म्हटले आहे आणि त्यात तथ्यसुध्दा आहे. यावेळच्या पराभवानंतर ती म्हणाली की मी ते दडपण व्यवस्थित हाताळू शकली नाही. कारण त्याचा अनुभवच नव्हता. मी शारीरीक व मानसिकदृष्ट्या 100 टक्के कामगिरी करु शकली नाही. मला असे वाटायचे की प्रत्येक जण मला विचारतोय, तु पुन्हा तिथे जिंकशील ना?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER