औरंगाबाद जिल्हा बँक निवडणुकीत हरिभाऊ बागडे यांचा पराभव

Haribhau Bagade - Maharastra Today

औरंगाबाद :- जिल्हा बँक निवडणुकीत माजी विधानसभा अध्यक्ष आणि बँकेचे संचालक असलेले हरिभाऊ बागडे (Haribhau Bagade) यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या निवडणुकीत अनेक अनपेक्षित निकाल हाती आले. जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील मोठं नाव असलेल्या बागडेंचा पराभव हा जिल्ह्याच्या राजकारणाचं बदललेलं वारं असल्याचं बोललं जात आहे.

जिल्हा बँक निवडणुकीत बागडे यांच्या पॅनलने मात्र दणदणीत विजय मिळवला आहे. मात्र स्वत: बागडे यांचा पराभव झाला. अपक्ष उमेदवार अभिषेक जैस्वाल यांनी बागडे यांचा पराभव केला आहे. बागडे यांना एकूण १२३ मतं मिळाली, तर जैस्वाल यांना १४७ मतं पडली. त्यामुळे जैस्वाल यांनी २४ मतांनी बागडे यांचा पराभव केला आहे.

हरिभाऊ बागडे यांच्यासह अभिजित देशमुख यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर अपक्ष उमेदवार अभिषेक जैस्वाल आणि जगन्नाथ काळे विजयी झाले आहेत. मतमोजणीदरम्यान बागडे हे मतमोजणी केंद्रावर आले होते. पण पराभवाची चाहूल लागताच ते माघारी परतले.

दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या आहेत. मात्र, बँकेचे जुने जाणते संचालक हरिभाऊ बागडे यांचा पराभव झाला आहे. बागडे यांच्या पराभवावर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘गड आला पण सिंह गेला’ असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER