चेन्नईत पराभव! गमावले जागतिक कसोटीचे अव्वल स्थान

Jitendra Awhad

मुंबई : भारतात येण्यापूर्वी श्रीलंका दौऱ्यावर आशिया खंडातील खेळपट्टीचा अभ्यास केलेल्या इंग्लंडच्या संघाने पहिली कसोटी सहज जिंकली. जेम्स अँडरसनच्या शतकाने टीम इंडियाला बॅकफूटवर पाठवले. शुबमन गिल आणि विराट कोहली यांची अर्धशतके वगळता भारतासाठी काहीच चांगले झाले नाही. भारताच्या पराभवाला शेतकरी आंदोलनावरून बदनामीच्या कारस्थानाशी जोडण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट करून ‘रामजीवी’ असे म्हटले आहे. इंग्लंडच्या ४२० धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला १९२ धावा करता आल्या.

इंग्लंडने हा सामना २२७ धावांनी जिंकला. ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर मायेदशी जल्लोषात स्वागत झालेल्या टीम इंडियाचा पराभव सर्वांनाचा आश्चर्यकारक आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरून अमेरिकन पॉपस्टार रिहानाने ट्विट केले. देशभरातील सेलिब्रिटींनी ‘इंडिया टुगेदर’ ही ट्विट मोहीम राबवली. भारतरत्न सचिन तेंडुलकरसह अनेक दिग्गज खेळाडूंनीही देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडता जपण्यासाठी ट्विट केले. इंग्लंडकडून झालेला भारताचा पराभव हा भारतीय क्रिकेटला बदनाम करण्यासाठी शिजत असलेल्या आंतरराष्ट्रीय कटाचा पुरावा आहे, यावरूनच जितेंद्र आव्हाड यांनी भाजपा नेत्यांना ट्विटवर टोला लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER