ही बाब महाराष्ट्राला काळिमा फासणारी ! देशमुखांचा तत्काळ राजीनामा घ्या; राज ठाकरे कडाडले

Raj Thackeray - Anil Deshmukh - Maharashtra Today

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि होमगार्डचे महासंचालक परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर (Anil Deshmukh) गंभीर आरोप केला आहे. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपली भूमिका स्पष्ट करत महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi) टीका केली आहे. या प्रकरणाने महाराष्ट्राची प्रतिमेला काळिमा लागल्याचं सांगत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

राज ठाकरे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ह्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र अत्यंत धक्कादायक आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे. गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी तत्काळ राजीनामा द्यायलाच हवा आणि ह्या प्रकरणात त्यांची उच्चस्तरीय चौकशीदेखील व्हायला हवी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER