शरद पवार, उद्धव ठाकरे, अजित पवारांची बदनामी; पुण्यात १३ जणांवर गुन्हा दाखल

Uddhav Thackeray - Ajit Pawar - Sharad Pawar

पुणे : महाविकास आघाडी सरकारचे (Mahavikas Aghadi) शिल्पकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar), महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची सोशल मीडियावर बदनामी करणं पुण्यातील तरुणांच्या चांगलंच अंगलट आलं आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणी १३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात आकाश शिंदे यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी या १३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

फेसबुक, व्हाटसअ‌ॅप आणि ट्विटर या सोशल साइट्सवर शरद पवार, उद्धव ठाकरे, अजित पवारांचे फोटो मॉर्फ करून बदनामी केल्याप्रकरणी १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय नेत्यांची फोटो मॉर्फ करून बदनामी केल्याप्रकरणी नाना पंडित, वैभव पाटील, महेश गहुडले, धनंजय जोशी, सोनाली राणे, जयसिंग मोहन, संदीप पाटील, शौर्यन श्रीकृष्ण चोरगे, अतुल अयाचित, राजेंद्र पवार, राज पाटील, मुकेश जाधव, स्वरूप भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

या प्रकरणी आकाश चंद्रकांत शिंदे यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार भादंवि कलम ४६९, ४९९,५००,५०४, ५०५(२), ३४ सह माहिती तंत्रज्ञान कायदा ६७ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button