सोशल मीडियावर चंद्रकांतदादा यांची बदनामी : पोलिसात तक्रार

Chandrakant Patil

कोल्हापूर :- सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल खोटी माहिती प्रसारित करणाऱ्या लोकांवर कारवाई व्हावी, अशी मागणी कोल्हापूर भाजपाने शुक्रवारी पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांच्याकडे शुक्रवारी एका निवेदनाद्वारे केली.

वैद्यकीय तपासणी आणि परवानगीनेच आपण कोल्हापुरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण पुण्यामध्ये पूर्ण वैद्यकीय तपासणी करूनच प्रवास करत कोल्हापुरला आलो आहोत. कोल्हापुरला आल्यावरही जिल्हा आरोग्य यंत्रणेने आपली तपासणी करून पत्र दिले आहे . येत्या ३१ मेपर्यंत आपण पुणे ते कोल्हापूर असा ये जा प्रवास किती वेळा करू शकतो, अशी वैद्यकीय परवानगी आपल्याकडे आहे. त्यामुळे या संदर्भातील विरोधी पक्ष नेत्यांनी उथळपणे सुरू केलेले सोशल मिडियावरील ट्रोलिंग बंद करून आपले होणारे हसे थांबवावे , असे औपचारिक आवाहनही या संदर्भाने भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सोशल मीडियाद्वारे जाहीर केले आहे.


Web Title : Defamation of chandrakant dada on social media complaint lodged

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER