पुढील वर्षी दिपिकाचे 5 सिनेमे प्रदर्शित होणार

Deepika Padukone

एखाद्या नायिकेचे एका वर्षात दोन किंवा तीन सिनेमे प्रदर्शित होणे म्हणजे मोठी गोष्ट मानली जाते. ज्याअर्थी एखाद्या नायिकेचे असे दोन-तीन सिनेमे प्रदर्शित होतात ती नायिका यशाच्या शिखरावर आहे असे मानले जाते. मात्र दीपिका पदुकोण (Deepika Padukone) पुढील वर्षी अनोखा विक्रम करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील वर्षी एक-दोन नव्हे तर दीपिकाचे पाच सिनेमे प्रदर्शित होऊ शकतात असे म्हटले जात आहे. असेही म्हटले जात आहे की, दीपिकानेही फॅमिली प्लॅनिंग केले असून 2022 मध्ये आई होण्याचा विचार तिने केला आहे. त्यामुळे हातातील सर्व प्रोजेक्ट पुढील वर्षीपर्यंत पूर्ण करण्याचा तिचा विचार आहे.

दीपिका पादुकोण सध्या शकुन बात्राच्या सिनेमाचे शूटिंग पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे. या सिनेमाचे नाव अजून नक्की झालेले नसून यात दीपिकासोबत सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे मुख्य भूमिका साकारीत आहेत. या सिनेमासोबतच दीपिकाने शाहरुख खानसोबत ‘पठाण’ सिनेमाचेही शूटिंग सुरु केले आहे. शाहरुखबरोबर दीपिकाचा हा तिसरा सिनेमा आहे. दीपिकाने करिअरची सुरुवातच शाहरुखसोबत फरहा खान दिग्दर्शित ‘ओम शांती ओम’मधून केली होती. त्यानंतर या दोघांनी रोहित शेट्टीच्या ‘चेन्नई एक्सप्रेस’मध्येही काम केले होते. प्रेक्षकांना या दोघांची जोडी खूपच आवडली होती. त्यामुळे ‘पठाण’चीही प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहे. याशिवाय दिपिकाचा नाग अश्विनच्या एका भव्य सिनेमातही काम करीत असून यात अमिताभ बच्चन, सुपरस्टार प्रभास यांच्या भूमिका आहेत. हा एक साय-फाय सिनेमा आहे. याशिवाय दिपिका सध्या ‘द इंटर्न’ सिनेमाच्या प्री-प्रॉडक्शनच्या कामात व्यस्त आहे. हा सिनेमा रॉबर्ट डी नीरो आणि अॅनी हॅथवे अभिनीत ‘द इंटर्न’ या हॉलिवुडपटाची हिंदी रिमेक आहे. या सिनेमात रॉबर्ट डी नीरोची भूमिका ऋषि कपूर साकारणार होता. परंतु आता त्यांच्या जागी नवा अभिनेता घेतला जाणार आहे. याशिवाय दीपिका महाभारत सिनेमातही काम करीत असून यात ती द्रौपदीची भूमिका करीत आहे. हे सर्व सिनेमे पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहेत. याशिवाय भारताने 1983 मध्ये वर्ल्ड कप जिंकला होता. त्यावर आधारित 83 हा सिनेमाही पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER