‘धूम ४’ मध्ये दीपिका दिसणार व्हिलनच्या भूमिकेत!

Deepika Padukone

मुंबई :- बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री दीपिका पादुकोण ‘धूम ४’ मध्ये दिसणार आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाचे कामदेखील सुरू केले आहे. या चित्रपटात दीपिका पादुकोण (Deepika Padukone) व्हिलनच्या भूमिकेत दिसणार आहे.

माहितीनुसार, चित्रपटांच्या निर्मात्यांनी दीपिका पादुकोणसोबत संपर्क साधला. दीपिकादेखील या चित्रपटामध्ये भूमिका करण्यासाठी उत्साहीत आहे, असे सांगितले जात आहे. हा चित्रपट साइन करण्याआधी त्यांच्या तारखा सांभाळाव्या लागतील. सध्या शाहरुख खानसोबत ‘पठाण’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये दीपिका व्यस्त आहे. या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे.

‘पठाण’ या चित्रपटात जॉन अब्राहम खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सध्या दीपिका पादुकोण शकुन बत्राच्या सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे यांच्या पुढच्या चित्रपटाची शूटिंग करत आहे. अलीकडेच दीपिकाने एक फोटो शेअर केला, ज्यात तिने ‘ओन्ली लव्ह’ लिहिले आहे. दीपिकाच्या आगामी चित्रपटाचे शीर्षक असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER