दीपिका म्हणते मी इंदिरानगरची गुंडी

Maharashtra Today

सोशल मीडियामुळे थेट फॅन्सशी जोडले जात असल्याने आणि एकच पोस्ट कोट्यवधी फॅन्सपर्यंत काही क्षणातच जात असल्याने बॉलिवूडमधील जवळ जवळ सगळे कलाकार सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहेत. सोशल मीडियावर केवळ सिनेमाशी संबंधित माहितीच नव्हे तर जुने, लहाणपणीचे, कौटुंबिक समारंभाचे, पिकनिकचे फोटोही कलाकार सोशल मीडियावर शेअर करू लागले आहेत. दीपिका पदुकोणही (Deepika Padukone) सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. दीपिकाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचा लहानपणीचा एक फोटो शेअर केला असून तिचा हा फोटो काही क्षणातच प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोला लाखो लाईक्स आणि प्रतिक्रियाही मोठ्या प्रमाणावर मिळाल्या आहेत.

काल दीपिकाने पोस्ट केलेला फोटो हा तिच्या लहानपणीचा आहे. या फोटोत ती जमिनीवर बसलेली दिसत असून खूपच सुंदर दिसत आहे. तिने डोक्यावर टोपी घातलेली असून अंगात स्वेटर आणि पायात सॉक्सही आहेत. कदाचित थंडीच्या दिवसातील हा फोटो असावा. या फोटोसोबत दीपिकाने लिहिले आहे, मी इंदिरानगरची गुंडी. यासोबत तिने हसणारा इमोजीही टाकला आहे. यासोबतच तिने हा फोटो तिच्या मामाने काढल्याचेही तिने लिहिले आहे.

दीपिका पदुकोण २०१९ मध्ये आलेल्या ‘छपाक’ सिनेमात दिसली होती. यात तिने अॅसिड अॅटॅकमध्ये चेहरा खराब झालेल्या तरुणीची भूमिका साकारली होती. त्यानंतर मात्र दीपिकाचा एकही सिनेमा रिलीज झाला नाही. दीपिका सध्या अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबत ‘द इंटर्न’, शाहरुख खानसोबत (Shahrukh Khan) ‘पठाण’ आणि शकुन बात्राच्या सिनेमात काम करीत आहे. पठाणचे आणि शकुन बात्राच्या सिनेमाचे शूटिंग तिने सुरु केले असून ‘द इंटर्न’चे शूटिंग ती लवकरच सुरु करणार आहे. याशिवाय ती पती रणवीर सिंहसोबत (Ranveer Singh) ‘८३’ सिनेमात दिसणार असून रोहित शेट्टी (Rohit Shetty) दिग्दर्शित पती रणवीर सिंह अभिनीत ‘सर्कस’ सिनेमात एक आयटम साँग आणि काही कॉमेडी सीनमध्येही दिसणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button