उद्यापासून शूटिंग सुरू करणार दीपिका पदुकोन

Deepika Padukone

मार्चमध्ये कोरोनामुळे (Corona) संपूर्ण देशात लॉकडाऊन (Lockdown) जाहीर करण्यात आला. सर्व व्यवहार बंद असल्याने गेल्या सहा महिन्यांपासून चित्रपटांचे शूटिंगही बंद होते. यामुळे अनेक चित्रपट पूर्ण होऊ शकले नाहीत तर ज्या चित्रपटांचे शूटिंग सुरू होणार होते तेसुद्धा सुरू होऊ शकले नाही. मात्र केंद्र सरकारने ऑगस्टमध्ये चित्रपट, मालिकांच्या शूटिंगला परवानगी दिली आणि पुन्हा एकदा लाईट्स, कॅमेरा, अॅक्शनला सुरुवात झाली.

सहा महिन्यांपासून घरी बसलेली दीपिका पदुकोनही (Deepika Padukone) आता शूटिंगला सुरुवात करणार आहे. शुक्रवारी म्हणजे ११ सप्टेंबर रोजी दीपिका गोव्याला शूटिंगसाठी जाणार आहे. शकुन बात्राने वर्षाच्या सुरुवातीला एका नव्या चित्रपटाला सुरुवात केली होती. याचे शूटिंग मार्च- एप्रिलमध्ये केले जाणार होते. परंतु लॉकडाऊनमुळे शूटिंग सुरू होऊ शकले नव्हते. चित्रपटात दीपिका मुख्य भूमिका साकारीत आहे.

या चित्रपटाचे नाव अजून निश्चित करण्यात आलेले नाही. मात्र शनिवारपासून गोव्यात चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्यात येणार आहे. या चित्रपटात दीपिकासोबत सिद्धार्थ आनंद आणि अनन्या पांडेही भूमिका करीत असून हे दोघेही शुक्रवारीच गोव्याला जाणार आहेत. दीपिकाचा रणवीर सिंहसोबतचा ‘८३’ लवकरच प्रदर्शित होणार असून हॉलिवूडच्या ‘द इंटर्न’च्या हिंदी रिमेकमध्येही दीपिका काम करणार असल्याचे सांगितले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER