रणबीर कपूरच्या रॉकस्टारसाठी झाली होती दीपिका पदुकोणची निवड

Deepika Padukone

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) द्वारा अभिनीत रॉकस्टार (Rockstar) चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला होता. रणबीर कपूरच्या अभिनयाची सगळ्यांनीच प्रशंसा केली होती. या चित्रपटात त्याची नायिका होती नरगिस फाखरी. नरगिस फाखरीने या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. रणबीर आणि नरगिसची जोडी प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. मात्र नरगिस फाखरीच्या अगोदर नायिकेच्या भूमिकेसाठी दिग्दर्शक इम्तियाज अलीने दीपिका पदुकोणची (Deepika Padukone) निवड केली होती. स्वतः इम्तियाजनेच ही माहिती दिली आहे.

इम्तियाजने त्याच्या वेबसाईटवर याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. हॉटेलच्या पोर्चमध्ये ती गाडीतून उतरली आणि तिने माझ्याकडे पाहिले. तिला पाहाताच मी ओळखले की याच मुलीला मी भेटण्यासाठी आलो आहे. ती गाडीतून उतरली आणि तिने माझ्याकडे पाहिले. तिनेही ओळखले की ज्या दिग्दर्शकाला भेटण्यासाठी ती आली आहे तो मीच आहे.

त्यानंतर मी ‘रॉकस्टार’ चित्रपटाची ऑफर दीपिकाला दिली. तेव्हा दीपिकाचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नव्हता. परंतु ‘रॉकस्टार’ बनण्यास खूप वर्षे लागल्याने मी दीपिकाला घेऊ शकलो नाही. आणि तिच्याऐवजी नरगिसला घेऊन चित्रपट पूर्ण केला. मी अनेक गोष्टी विसरू शकतो परंतु त्या मुलीला विसरू शकत नाही.

पहिल्याच भेटीत माझ्याकडे पाहाताना मी तिला ओळखत असल्याचे भाव तिच्या नजरेत मला दिसले होते. त्यामुळे मी तिला कधीच विसरू शकणार नाही. रॉकस्टारमध्ये जरी इम्तियाज आणि दीपिका एकत्र य़ेऊ शकले नव्हते तरी नंतर मात्र या दोघांनी ‘कॉकटेल’, ‘लव आज कल’ आणि ‘तमाशा’ हे चित्रपट एकत्र केले.

ही बातमी पण वाचा : या कारणामुळे झाले होते हरमन बावेजाचा प्रियंका चोपडासोबत ब्रेकअप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER