‘छपाक’साठी दीपिका पदुकोण सिद्धिविनायकाच्या चरणी

Deepika Padukone-visit-siddhivinayak-temple-for-blessing-chhapaak-movie

मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचा बहुप्रतिक्षित ‘छपाक’ चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट आज प्रदर्शित होताच दीपिका सिद्धिविनायक मंदिरात गजाननाच्या दर्शनाला गेली. दीपिका तिच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या क्षणी ती सिद्धिविनायक मंदिरात जाते. दीपिकाने यावेळी क्रीम रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता. ड्रेसला साजेसे हेवी वेट कानातलेही तिने घातले होते.

‘छपाक’ चित्रपटात दीपिकासोबत विक्रांत मेसी मुख्य भुमिकेत आहे. सत्य घटनेवर आधारित हा सिनेमा ऍसिड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवाल यांच्या आयुष्यावर आधारित असून चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलझार यांनी केले आहे . हा चित्रपट आज (१० जानेवारी ) प्रदर्शित झाला. दरम्यान आजच अजय देवगण, काजोल आणि सैफ अली खान यांचा ‘तानाजी:द अनसंग वॉरीअर’ सिनेमाही प्रदर्शित झाला.

या चित्रपट पाहिल्यावर तिचा पती अभिनेता रणवीर सिंगने तिचे तोंडभरून कौतुक केले आहे . . दीपिकासाठी रणवीरने लिहिलं की, ‘मी तुला या भूमिकेसाठी मेहनत करताना पाहिलं आहे. तू या सिनेमाचं इंजिन आणि आत्मा आहेस. हा तुझ्या आतापर्यंतच्या करिअरमधला सर्वात महत्त्वपूर्ण सिनेमा आहे. असंच प्रामाणिकपणे काम करत रहा. तुझा परफॉर्मन्स खूप सुंदर होता. मालतीकडून तुला जे मिळालं ते हैराण करणारं आहे. मला तुझा याहून जास्त अभिमान यापूर्वी वाटला नव्हता. आय लव्ह यू.’असे रणवीर म्हणाले .

दीपिकाच्या सिनेमावर बहिष्कार टाकणे दुर्दैवी : अमोल कोल्हे