म्हणून दीपिका पदुकोणने संजय लीला भंसाळीच्या ऑफर नाकारल्या

Sanjay Leela Bhansali - Deepika Padukone

बॉलिवूडमध्ये (Bollywood) छोट्या छोट्या गोष्टींमुळे अनेकदा कलाकारांमध्ये वाद निर्माण होतात. अशा वादांमुळे चांगले मित्रही एकमेकांचे तोंड पाहणे बंद करतात. हे वाद अनेकदा खूप काळापर्यंत सुरू राहतात. काही काळानंतर पुन्हा सगळे सुरळीत होते. असाच काहीसा प्रकार दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि संजय लीला भंसाळी (Sanjay Leela Bhansali) यांच्याबाबतही झाला आहे. संजय लीला भंसाळीने एक महत्त्वाची भूमिका साकारण्याची संधी न दिल्याने दीपिका ही संजय लीला भंसाळीवर नाराज झाली आणि त्यामुळेच तिने त्याच्या दोन ऑफर नाकारल्याचे बॉलिवूडमध्ये बोलले जात आहे.

खरे तर संजय लीला भंसाळी आणि दीपिका पदुकोण यांची अत्यंत चांगली गट्टी होती. या दोघांनी ‘गोलियों की रासलीला- राम लीला’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’ या तीन सिनेमांतून एकत्र काम केले. हे तिन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाले होते. त्यानंतर या दोघांनी पुन्हा एकत्र यावे आणि असाच चांगला सिनेमा द्यावा, असे या दोघांच्या फॅन्सना वाटत होते. परंतु या दोघांमध्ये ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमामुळे दुरावा निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संजय लीला भंसाळी रणबीर कपूर (Ranbir Kapoor), आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि दीपिका पदुकोणसोबत ‘बैजू बावरा’ सिनेमाची तयारी करीत होता. परंतु काही कारणांमुळे हा सिनेमा आकार घेऊ शकला नाही.

‘बैजू बावरा’ सुरू होत नाही हे दिसल्यावर संजय लीला भंसाळीने ‘गंगूबाई काठियावाडी’ला सुरुवात केली. दीपिकाला या सिनेमाबाबत माहिती मिळाल्यानंतर गंगूबाईची भूमिका साकारण्यास मिळावी अशी दीपिकाची इच्छा होती. पण संजय लीला भंसाळीने दीपिकाऐवजी प्रियंका चोप्राला (Priyanka Chopra) गंगूबाई बनवण्याचे ठरवले. पण प्रियंका हॉलिवूडमध्ये बिझी झाल्याने त्याने आलिया भट्टची गंगूबाईच्या भूमिकेसाठी निवड केली. संजय लीला भंसाळीने सलमान खान (Salman Khan) आणि आलियासोबत ‘इंशाअल्लाह’ सिनेमा सुरू करण्याचे ठरवले होते. पण तो सिनेमा सुरू न झाल्याने त्याने आलियाला गंगू बाईच्या भूमिकेसाठी साईन केले. त्यामुळे दीपिका खूप नाराज झाली. त्यामुळेच संजय लीला भंसाळीने जेव्हा दीपिकाला ‘गंगूबाई काठियावाडी’मध्ये आयटम साँग करण्यास सांगितले तेव्हा दीपिकाने चक्क नकार दिला. एवढेच नव्हे तर संजय लीला भंसाळीने त्याच्या ‘हीरा मंडी’ सिनेमातही आयटम साँग करण्याची ऑफर दिली होती. पण दीपिकाने ही ऑफरही नाकारली आणि संजय लीला भंसाळीवर नाराज असल्याचे दाखवून दिले. दीपिकाने दोन्ही ऑफर नाकारल्यानंतर संजय लीला भंसाळीनेही आता दीपिकासोबत काम न करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

पण बॉलिवूड अशी जागा आहे जेथे दोन कलाकारांमध्ये जास्त काळ शत्रुत्व राहात नाही. त्यामुळेच या दोघांची नाराजीही किती काळ कायम राहते ते पाहणे मनोरंजक ठरेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button