दीपिका पादुकोणने एक फनी व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना दाखवले गरबा डान्स

Deepika Padukone

दीपिका पादुकोण ही बॉलिवूडमधील सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो केले जाणारी अभिनेत्री आहे. तिचे ५ कोटी पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. दीपिकाचे अकाउंट सुंदर फोटो, कुटूंब आणि रणवीर सिंगसाठी उत्तम पोस्ट्सने भरलेले होते. तथापि, नवीन वर्ष २०२१ मध्ये, दीपिका पादुकोणने तिच्या सर्व मेमोरीज हटवण्याचा आणि क्लीन स्लेटसह पुन्हा सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. हे पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला, दीपिकाने हे करण्याचे कारण कोणालाही समजले नाही.

अलीकडेच दीपिका पादुकोण पुन्हा सोशल मीडियावर सक्रिय झाली. ऑडिओद्वारे लोकांपर्यंत आपले बोलणे पोहोचवण्यास सुरुवात केली. यासह, तिने अत्यंत काळजीपूर्वक वेगवेगळ्या विषयांवर आपले मत व्यक्त केले. दीपिका आता ऑडिओ पोस्ट शेअर करत आहे. नुकताच तिने आपल्या मैत्रिणीचा मजेदार गरबा डान्स करण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

पोस्ट सोबत कॅप्शनमध्ये दीपिकने लिहिले आहे की, “एखादा मित्र शोधा जो कोणत्याही गाण्यावर गरबा करू शकेल.” व्हिडिओमध्ये दीपिका पादुकोण कॅज्युअल स्वेटशर्ट आणि स्कर्टमध्ये दिसत आहे. दीपिका पादुकोणचा हा व्हिडिओ आतापर्यंत सात लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे.

दीपिका पादुकोण सध्या शाहरुख खानसोबत ‘पठाण’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याची माहिती आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करीत आहेत. त्याचवेळी नुकतीच दीपिका पादुकोणने अनन्या पांडे आणि सिद्धार्थ चतुर्वेदी यांच्यासह दिग्दर्शक शकुन बत्रा यांच्या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली आहे. मात्र, अद्याप या चित्रपटाचे नाव समोर आले नाही. याशिवाय दीपिका पादुकोण एन हैथवेच्या इंग्रजी चित्रपट ‘द इंटर्न’ च्या हिंदी रिमेकमध्येही दिसणार आहे. तसंच दीपिका टॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती प्रभास सोबत नाग अश्विनच्या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे नावदेखील अद्याप समोर आलेले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER