दीपिका पदुकोन, सारा अली खान आणि श्रद्धा कपूरची आज ‘एनसीबी’कडून होणार चौकशी

Deepika Padukone- Sara Ali Khan-Shraddha Kapoor.jpg

मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाच्या (Sushant Singh Rajput death case) चौकशीमध्ये बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण समोर आले आहे. यामध्येच अभिनेत्री दीपिका पदुकोणसह (Deepika Padukone) बॉलिवूडमधील काही दिग्गज अभिनेत्रींची नावंदेखील उघड झाली आहेत.

यापार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान (Sara Ali Khan), श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) या तिघींची अमली पदार्थ विरोधी पथक (एनसीबी) चौकशी करणार आहे. अभिनेता दीपिकाला शनिवारी सकाळी 10 वाजता एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. तर सारा अली खान आणि श्रद्धा कपूरला 10.30 वाजता चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे.

तर दुसरीकडे धर्मा प्रोडक्शन्सचे संचालक निर्माता क्षितीज प्रसाद यांची 20 तासापासून चौकशी सुरु आहे. त्याशिवाय शुक्रवारी (25 सप्टेंबर) अभिनेत्री रकुल प्रीत सिंहसह दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांना एनसीबीने चौकशी केली होते. या चौकशी दरम्यान दोघींकडूनही अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER