दीपिका अभ्यास कर! रामदेव बाबांचा सल्ला

Deepika Padukone-ramdev baba

इंदूर : योगगुरू रामदेव बाबा यांनी अभिनेत्री दीपिका पदुकोणला राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रश्नांचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला आहे. इंदूर येथे माध्यमांशी बोलताना रामदेव बाबा यांनी हा सल्ला दिला.

दिल्लीतील जेएनयू विद्यापीठात घडलेल्या हिंसाचारानंतर, दीपिकाने विद्यापीठाला भेट देऊन निषेध नोंदविला होता. त्यावेळी तिने विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शविल्याने भाजपा नेत्यांसह अनेक संघटनांकडून तिच्यावर टीका करण्यात आली होती. डाव्या संघटनांसह काँग्रेस व अन्य काही पक्षांच्या नेत्यांनी मात्र, तिचे समर्थन केले.

या पृष्ठभूमीवर, माध्यमांशी बोलताना रामदेव बाबा म्हणाले, दीपिका पदुकोणला राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रश्नांचा अभ्यास करण्याची गरज असून, तिने आपल्या देशाबद्दल अधिक जाणून घेण्याची गरज आहे. ज्ञान मिळवल्यानंतरच तिने निर्णय घ्यावेत. तिच्याकडे योग्य सल्ल्यासाठी स्वामी रामदेव यांच्यासारखी व्यक्ती असली पाहिजे, असेही रामदेव बाबा यावेळी म्हणाले.

दीपिका पदुकोण ‘जेएनयू’त विद्यार्थ्यांच्या भेटीला