दीपिका पदुकोणने सुरु केली ‘ऑडियो डायरी’

Deepika Padukone - Audio Diary

सगळे कलाकार सोशल मीडियावरील ट्विटर, इन्स्टाग्राम अकाउंट वापरून आपल्या मनातील भाव-भावना आणि आयुष्यातील प्रसंगांची माहिती त्यांच्या फॅन्सशी आणि बॉलिवुडमधील (Bollywood) सहकलाकारांशी शेअर करीत आहेत. त्यामुळेच सर्वच कलाकारांचे, निर्माता, दिग्दर्शकांने लाखोंनी फॅन्स आहेत. मात्र शुक्रवारी जेव्हा दीपिका पदुकोणने (Deepika Padukone) तिच्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाउंटवरील सर्व जुन्या पोस्ट डिलीट केल्या, तेव्हा दीपिका सोशल मीडियातून बाहेर पडते की काय असा प्रश्न विचारला जाऊ लागला. मात्र काही वेळातच दीपिकाने एका अनोख्या आणि नव्या प्रयोगाला सुरुवात केली. दीपिकाने ‘ऑडियो डायरी’ची सुरुवात करीत कलाकारांना आणखी एका नव्या उपक्रमाची माहिती करून दिली आहे.

दीपिकाने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी ऑडियो डायरी पोस्ट करीत फॅन्सना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. आतापर्यंत कलाकार फोटो किंवा व्हिडियोच्या माध्यमातून त्यांच्या मन की बात शेअर करीत असत पण आता दिपिकाने फक्त आवाजाच्या माध्यमातून फॅन्सशी बोलण्याचे ठरवले आहे असे दिसते. या ऑडियो डायरीमध्ये दीपिका म्हणते, ‘तुम्हा सगळ्यांचे माझ्या या ऑडियो डायरीमध्ये स्वागत आहे. येथे मी माझ्या मनातील विचार तुमच्यासमोर मांडणार आहे. मागील वर्ष म्हणजे 2020 खूपच अनिश्चिततेने भरले होते. परंतु माझ्यासाठी हे मागील वर्ष खूप काही शिकवून जाणारे ठरले. 2020 हे माझ्या कृतज्ञता व्यक्त करणारे वर्षही ठरले आहे. 2021 मध्ये मी एवढेच सांगू इच्छिते की, तुमच्या सगळ्यांची प्रकृती चांगली राहो आणि तुमच्या मनाला शांती लाभो. सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा.

मात्र दीपिकाने तिच्या अकाउंटवरील सर्व पोस्ट डिलीट का केल्या त्याची माहिती मात्र या ऑडियो डायरीत दिलेली नाही. बॉलिवुडमध्ये चर्चा आहे की, दीपिका एखादी नवीन ऑडियो सीरीज सुरु करण्याच्या विचारात असून आज रिलीज केलेला ऑडियो ही त्याचीच सुरुवात असू शकेल. या ऑडियो डायरीच्या माध्यमातून दीपिका फॅन्सबरोबर तिच्या मनातील भावना शेअर करण्याची शक्यता असून तिच्या नव्या प्रोजेक्ट किंवा तिच्या एनजीओच्या कामाबाबत माहिती देईल असेही सांगितले जात आहे. पण एकंदरच दीपिकाने बॉलीवुडमधील कलाकारांना एका नव्या व्यासपीठाची सुरुवात तर करून दिली आहे. आता आणखी काही कलाकारांनी ऑडियो डायरी सुरु केली तर आश्चर्य वाटणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER