दीपिका द्रौपदी, सैफ रावण आणि प्रभास राम, रामायण – महाभारतावर येणार आहेत हे चित्रपट

Saif Ali Khan - Deepika Padukone - Prabhas - Adipurush

बाहुबलीच्या (Baahubali) माध्यमातून प्रेक्षकांच्या हृदयावर छाप पाडणारा प्रभास आता ‘आदिपुरुष’मध्ये भगवान रामच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात त्याची नायिका कृती सॅनॉन असून ती सीताची भूमिका साकारणार आहे. इतकेच नाही तर या सिनेमात तुम्हाला प्रभास (Prabhas) आणि सैफ अली खान यांच्यातही स्पर्धा पाहायला मिळेल. सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रभाससमवेत लंकेशच्या भूमिकेत सैफला पाहून चाहते खूप उत्साही आहेत. रामायणवर आधारित हा चित्रपट ११ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. बाहुबलीप्रमाणेच ती तेलुगु, तामिळ, कन्नड आणि हिंदीसह इतर अनेक विदेशी भाषांमध्येही सादर केली जाणार आहे. मूळत: या चित्रपटाचे चित्रीकरण हिंदी आणि तेलगूमध्ये केले जाईल, तर अन्य भाषांमध्ये डबिंग केले जाईल.

अलीकडेच झालेल्या संभाषणात सैफ अली खानने (Saif Ali Khan) सांगितले की आपल्या रावणातील भूमिकेबद्दल मी खूप उत्सुक आहे. एवढेच नव्हे तर सैफनेही रावणचा मानवी चेहरा चित्रपटात दाखवण्याचे संकेत दिले आहेत. सैफच्या मते, राम आणि रावण यांच्यातील युद्ध चित्रपटात शूपर्णखाच्या नाक कापल्याव्दारे दिसून येईल. चित्रपटात कदाचित रावणाकडून सीतेचे अपहरण आणि युद्ध छेडणे बदला म्हणून दर्शविले जाऊ शकते. ऐतिहासिक चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर तान्हाजीनंतर हा सैफचा दुसरा चित्रपट असेल. अजय देवगन सोबतच तान्हाजीमधील सैफच्या भूमिकेचेसुद्धा कौतुक झाले.

सांगण्यात येते की पुराणकथावर आधारित अनेक चित्रपट येत्या काळात येणार आहेत. यामध्ये दीपिका पादुकोण (Deepika Padukone) स्टारर महाभारतचा समावेश आहे. २०२१ च्या दिवाळीदरम्यान हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल होऊ शकतो. या सिनेमात दीपिका द्रौपदीच्या भूमिकेत दिसू शकेल. या चित्रपटात द्रौपदीची व्यक्तिरेखा प्रमुख असणार आहे.

याशिवाय अक्षय कुमारचा राम सेतु हा चित्रपटही येणार आहे. दिवाळीनिमित्त अक्षय कुमारने या चित्रपटाचे पोस्टर प्रसिद्ध केले आणि लोकांना भगवान रामचे आदर्श पाळण्याचे आवाहन केले. अभिषेक शर्मा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. सांगण्यात येते की, आमिर खान, ज्यांना मिस्टर परफेक्शनिस्ट देखील म्हणतात, आजकाल महाभारतावर आधारित सिनेमा बनवण्याची तयारी करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER