दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण; अखेर श्रीनिवास रेड्डी याला अटक

Maharashtra Today

अमरावती :- वन अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात (Deepali Chavan suicide case) मोठी घडामोड घडली आहे. या प्रकरणी अखेर पोलिसांनी मोठी कारवाई करत निलंबित अप्पर मुख्य प्रधान सचिव श्रीनिवास रेड्डी (Srinivasa Reddy) यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक केली आहे. या प्रकरणातली ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

रेड्डी याला ताब्यात घेण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी मंत्रालयातून रीतसर परवानगी घेतली. त्यानंतर बुधवारी नागपूर शहर पोलिसांच्या मदतीने रेड्डीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. रेड्डी यांच्या मुलाला तसे पत्रही दिल्याची विश्‍वसनीय माहिती आहे. याप्रकरणी अमरावतीच्या तपास अधिकारी पुनम पाटील यांनी मीडियाला माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला. या प्रकरणी सर्वात आधी २५ मार्च रोजी विनोद शिवकुमार यांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा ३०६ नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button