Deepali Chavan Suicide Case- DFO शिवकुमार याला तीन दिवसांची पोलीस कोठडी

मुंबई : वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण (Deepali Chavan Suicide Case) यांच्या आत्महत्येनंतर शेकडो महिलांनी पोलीस ठाण्यात धडक दिली. या आत्महत्याप्रकरणात पोलिसांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील (Melghat Tiger Project) उप वनसंरक्षक विनोद शिवकुमार (Vinod Sivakumar) याला शुक्रवारी अटक केली. दरम्यान सकाळी त्याला नागपुर रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी शिवकुमारला धारणी न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरीसाल येथे वनपरिक्षेत्र अधिकारी पदावर दबंग कामगिरी बजावत असलेल्या दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली. यावरून खळबळ उडाली आहे. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून दीपाली चव्हाण यांनी गोळी झाडून आत्महत्या केल्याचा आरोप त्यांनी सुसाईट नोटमध्ये लिहिल्या आहेत. स्वत: दीपालीने मृत्यूपुर्वी चिठ्ठी लिहून त्यात विनोद शिवकुमार आणि संचालक श्रीनिवास रेड्डी यांनी त्रास दिल्याचे म्हटले आहे.

दीपालीच्या आत्महत्याप्रकरणात व्याघ्र प्रकल्पाचे संचालक एन. श्रीनिवास रेड्डी यांच्याही अटकेची मागणी तिच्या कुटुंबियांनी व तिच्या पाठीराख्यांनी केली आहे. या प्रकरणात त्यांनी जोरदार निदर्शनेही केली होती. या दोन्ही आरोपींनी तिची सतत अवहेलना केल्यामुळेच वैतागून दीपालीने आत्महत्या केल्याचा तिच्या कुटुंबियांचा आरोप आहे.

DFO शिवकुमारला नागपुरात बेड्या

DFO विनोद शिवकुमार याच्या जाचाला कंटाळून दीपालीने आत्महत्या केल्याने धारणी पोलिसांनी त्याला नागपुरातून अटक केली. त्याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्यानंतर आज अनेक महिलांनी पोलिसात धडक दिली. आरोपी शिवकुमारला ताब्यात देण्याची मागणी महिलांकडून केली जात आहे. आरोपीला कोर्टात नेताना महिला आक्रमक झाल्या. शिवकुमारचा निषेध व्यक्त करत महिलांनी घोषणाबाजी केली. तसेच त्याला सेवेतून बडतर्फ करण्याचीही मागणी महिलांनी केली आहे.

फाशीची शिक्षा देण्याची मागणी

दरम्यान, दीपाली चव्हाण यांच्या आईने आरोपी शिवकुमारला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. वनविभागाच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी राज्यभरातून होत आहे. विनोद शिवकुमार याला निलंबन करून श्रीनिवास रेड्डी यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा दीपाली चव्हाण यांचा मोरगाव येथे अंत्यसंस्कार झाले. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी चव्हाण कुटुंबाचे सांत्वन करून श्रद्धांजली वाहिली.

दीपाली यांची सुसाईड नोट

दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर चार पानी सुसाईड नोट सापडली. श्रीनिवास रेड्डी यांच्या नावे ही सुसाईड नोट लिहिण्यात आली आहे. यात वरिष्ठ अधिकारी DFO विनोद शिवकुमार यांनी मानसिक त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, RFO दीपाली चव्हाण आणि DFO विनोद शिवकुमार यांच्यामध्ये फोनवरून जे संभाषण झाले, त्यांची कथित ऑडिओ क्लिप मिळाले आहे. यामध्ये संबंधित अधिकारी वनविभागाच्या महिला अधिकाऱ्यांसोबत कशाप्रकारे एकेरी भाषेत बोलतात. बोलताना मान मर्यादा आणि महिलांशी कसे बोलायचे यांचेसुद्धा भान त्यांना उरलेले नाही, हे ऑडिओ क्लिप्समधून स्पष्ट होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER