दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी क्षेत्रसंचालक एम. एस रेड्डी निलंबित!

Deepali Chavan suicide case area director M. S Reddy suspended - Maharastra Today

मुंबई :- वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एम. एस रेड्डी यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. हा निर्णय महाराष्ट्र सरकारने (Government of Maharashtra) घेतल्याची माहिती एएनआयने दिली आहे. आत्महत्येपूर्वी दीपाली चव्हाण यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये रेड्डी यांच्यादेखील नावाचा उल्लेख आहे. याच आधारावर रेड्डी यांना निलंबित करण्यात आले आहे.

२५ मार्च रोजी मेळघाटमध्ये दीपाली चव्हाण यांनी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केली. या प्रकरणात विनोद शिवकुमारला अटक केली आहे. चिठ्ठीमध्ये विनोद शिवकुमार याने छळ केल्याचा उल्लेख आहे. केला होता.

दीपाली चव्हाण डिंक तस्करांचा पाठलाग करताना दुचाकीवर मध्य प्रदेशपर्यंत त्यांचा पाठलाग करत गेल्या, असा किस्सा अधिकारी आणि कर्मचारी अभिमानाने सांगतात. त्यामुळे लेडी सिंघम म्हणून त्यांची ओळख होती. पण अचानक त्यांच्या आत्महत्येचे वृत्त समोर आल्याने सगळ्यांनाच धक्का बसला. त्यांनी आत्महत्येपूर्वी ४ पानांची सुसाईड नोट लिहिली, त्यात आपल्यावर होत असलेल्या छळाचा उल्लेख त्यांनी केला आहे.

रेड्डी यांच्या अटकेची मागणी भाजपकडून करण्यात आली. अपर मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर मंगळवारी भाजपकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर रेड्डी यांच्यावर कारवाईसाठी दबाव येत असताना सरकारकडून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button