राष्ट्रवादी अडचणीत ; पवारांचा निकटवर्तीय नेता करणार शिवसेनेत प्रवेश

uddhav and sharad pawar

सोलापूर :- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे वाहू लागले आहे. आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजप-शिवसेनेत प्रवेश केला. अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेसची गळती सुरूच असून आता पक्षांतर करणाऱ्यांच्या यादीत आता सोलापूरचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसू शकतो. दीपक साळुंखे सांगोला विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. साळुंखे हे शरद पवार आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात.

ही बातमी पण वाचा : बापाला दुसऱ्यांच्या दारात मुजरा करायला लावणारे वंशाचे दिवे काय कामाचे :…

राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. तसेच निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते पक्षांतर करत आहेत.दीपक साळुंखे हे सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून आले होते. परंतू २०१६ मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपाचे सहयोगी आमदार प्रशांत परिचारक यांनी साळुंखे यांचा पराभव केला होता. तसेच साळुंखे हे सांगोला सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. या कारखान्याच्या चौकशीचे आदेश नुकतेच देण्यात आले आहेत, हे विशेष.

ही बातमी पण वाचा : नागपूर बोले तो; भाजपचा माजी आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर

दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी विधानसभेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच आताही कॉंग्रेस आणि भाजपचे अनेक नेते भाजप आणि सेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अडचणी वाढणार आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप –सेना युतीची ताकद वाढत आहे. तर काँग्रेस -राष्ट्रवादी कमकुवत होताना दिसत आहे.

ही बातमी पण वाचा : ‘अपना नाना अभीभी मार्केट में चलता है’ – सुप्रिया सुळे