राष्ट्रवादीत प्रवेश हा काय घरगुती निर्णय आहे का? स्थानिक नेत्याचा सवाल

मुंबई : जिल्हा बँकेंच्या निवडणुकीवरून राष्ट्रवादीतच दोन गट पडल्याचं दिसून येत आहे. राष्ट्रवादीतील एक गट शशिकांत शिंदेविरोधात आक्रमक झाला आहे, यावरून जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी चाललेले राजकारण न समजायला जनता खुळी नाही असे विधान राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्याने केले आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि जिल्हा परिषदेचे सदस्य दीपक पवार यांनी पत्रक काढत म्हटले .

मागील १५-२० दिवसांपासून वृत्तपत्राच्या माध्यमातून शिवेंद्रराजे भोसलेंबाबत बातमी वाचायला मिळत आहे, शिवेंद्रराजेंना राष्ट्रवादीत येण्याचं निमंत्रण दिलं जातंय, विधानसभेच्या काळात शरद पवारांची पावसात भरसभेत माझी झालेली चूक दुरुस्त करा, या दोन्ही राजांना घरपोच करा असं विधान केले होते, पवारांच्या या विधानावर लोकांनी विश्वास दाखवत जावलीतून ७६ हजारांचे मतदान झाले. प्रत्येक महिन्याला मी शरद पवारांना भेटतो, जयंत पाटील, अजित पवारांचीही भेट झाली, मात्र एकदाही शिवेंद्रराजेंना पक्षात घ्यायचं आहे असं कुठेही त्यांनी सांगितलं नाही किंवा जिल्हा पदाधिकाऱ्यांमध्ये कुठेही ठराव झाला नाही असं ते म्हणाले.

शिंदे म्हणतात, शिवेंद्रराजे भोसलेंना राष्ट्रवादीत या, नगरपालिका तुमच्या नेतृत्त्वात लढू, हा काय घरगुती पक्षप्रवेश कार्यक्रम आहे का? कुठेतरी विचार करून बोललं पाहिजे, ज्या ७६ हजार मतदारांनी राष्ट्रवादीला मतदान केले त्यांना तुम्ही हे विचारलं का? शशिकांत शिंदे यांच्या आवाहनामुळे कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल झाली आहे. जिल्ह्यात विविध संस्थेवर राष्ट्रवादीची सत्ता आहे, मग शिवेंद्रराजेंना घेऊन राष्ट्रवादीची सत्ता येणार आहे का? ज्यांनी २ बँका बुडवल्या आणि ५ संस्था मोडीत काढल्या त्यांना राष्ट्रवादीत घेणार का? असा सवाल दीपक पवार यांनी शशिकांत शिंदेंना विचारले आहे.

त्याचसोबत ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीला चांगले यश मिळालं, अनेक ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे मग असे असताना शशिकांत शिंदे अशाप्रकारे विधान ज्या ७६ हजार मतदारांनी राष्ट्रवादीला साथ दिली. त्या मतदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करत आहेत. तो संभ्रम त्यांनी तत्काळ थांबवावा, असेही दीपक पवार म्हणाले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER