दीपक केसरकर यांना शिवसेनेचा ‘जोर का झटका’

CM Uddhav Thackeray And Deepak Kesarkar

रत्नागिरी(प्रतिनिधी):राज्य शासनाने धक्कादायक निर्णय घेत, दीपक केसरकर यांनी मंत्री असताना प्रतिष्ठेची केलेली सिंधुदुर्गातील ‘चांदा ते बांदा’ योजना रद्द केली आहे. नियोजन विभागाच्या उपसचिवांनी पत्र पाठवून सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांना याची माहिती कळविली आहे. इतकेच नव्हे तर प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांना कार्यारंभाची पत्रे देऊ नयेत असे आदेश देण्यात आले आहेत.

रत्नागिरीत महाविकास आघाडी होणार नाही- राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सुदेश मयेकर

दीपक केसरकर यांनी मंत्री असताना प्रतिष्ठेच्या केलेल्या चांदा ते बांदा योजनेला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गुंडाळून ठेवत केसरकर यांना जोर का झटका दिला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी उपसचिव यांना आदेश देत सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांना योजना रद्द झाल्याचे कळवले आहे. ‘चांदा ते बांदा’ योजना रद्द झाली तर प्रसंगी आमदारकी पणाला लावेन असे केसरकर यांनी जाहीर केले होते. त्यामुळे आता केसरकर यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दीपक केसरकर यांच्यासाठी सध्याच्या सरकारमध्ये कठीण काळ सुरू आहे.

महाविकास आघाडीचेसरकार आल्यानंतर आपल्याला सरकारमधे कॅबिनेट मंत्रीपद मिळेल या आशेवर असलेल्या केसरकर यांना उदय सामंत कॅबिनेट मंत्री झाल्याने पहिला झटका बसला होता. त्यानंतर उदय सामंत याना सिंधुदुर्गचे पालकमंत्रीपद देऊन त्यांना दुसरा झटका दिला होता. आता मात्र खुद्द पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केसरकर यांची योजनाच रद्द करून त्यांना त्यांची जागा दाखवल्याची चर्चा सिंधुदुर्गमधे सुरु झाली आहे.