दीपक चहरचा नागपुरात कहर

टी-२० आंतरराष्टÑीयमधील सर्वोत्तम गोलंदाजी भारतातर्फे टी-२० मधील पहिली हॅट्ट्रीक बांगलाचा डाव शब्दश: गुंडाळला


भारताचा नव्या दमाचा मध्यमगती गोलंदाज दीपक चहर याने रविवारी नागपूरच्या व्हीसीए जामठा स्टेडियमवर अक्षरश: कहर केला आणि ३.२ षटकातच फक्त ७ धावा देऊन सहा गडी बाद करत बांगलादेशचा डाव शब्दश: गुंडाळला. बांगलादेशच्या डावातील शेवटचे तीन गडी त्याने लागोपाठच्या चेंडूवर बाद करत हॅट्ट्रीक पूर्ण करत भारताचा विजय साजरा केला.

यासह टी-२० आंतरराष्टÑीय क्रिकेटमध्ये भारतातर्फे हॅट्ट्रीक करणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला मात्र त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे आता टी-२० आंतरराष्टÑीय क्रिकेटमध्ये दीपक चहरपेक्षा गोलंदाजीत चांगली कामगिरी इतर कुणाचीही नाही. त्याच्या ३.२ षटकात सात धावात सहा बळी हे टी-२० आंतरराष्टÑीय सामन्यांतीेल गोलंदाजीचे सर्वोत्तम विश्लेषण आहे.

अजंथा मेंडिसचा विक्रम मोडला

याआधी सर्वोत्तम गोलंदाजी श्रीलंकेच्या अजंथा मेंडिसच्या नावावर होती. त्याने ८ धावात सहा बळी अशी कामगिरी केली होती मात्र दीपक चहरने त्यालाही मागे टाकले.

मलिंगा व जेमिसनची बरोबरी

टी-२० क्रिकेटमध्ये मात्र दीपक चहरसारखेच ७ धावात ६ बळी असे विश्लेषण आणखी दोघांचे आहे. लसिथ मलिंगाने बिग बॅश लीगमध्ये आणि न्यूझीलंडमधील स्थानिक स्पर्धेत कायले जेमीसन नावाच्या गोलंदाजाने अशी कामगिरी केली आहे. मात्र आंतरराष्टÑीय क्रिकेटमध्ये आता दीपक चहरच सर्वोत्तम गोलंदाजीच्या कामगिरीत नंबर वन आहे.

या २७ वर्षीय गोलंदाजाचा हा केवळ सातवा टी-२० आंतरराष्टÑीय सामना होता आणि त्याची याआधीची सर्वोत्तम कामगिरी विंडीजविरुध्दच्या ४ धावात तीन बळींची होती.

अशी केली हॅट्ट्रीक
चहरने आपल्या तिसºया षटकाच्या आणि डावतील १८ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शफिउल इस्लाम याला राहुलकडून झेलबाद केले. त्यानंतर २० व्या षटकाच्या पहिच्याच चेंडूवर त्याने मुस्तफिझूर रहमान याला अय्यरकडे झेल देण्यास भाग पाडले आणि पुढल्याच चेंडूवर अमिनूल इस्लामचा त्रिफळा उडवून आपली हॅट्ट्रीक साजरी केली.