दीप सिद्धूची शेतकरी नेत्यांना ‘सिक्रेट’ उघड करण्याची धमकी

Deep Sidhu threatens to reveal secrets to farmer leaders

दिल्ली : दिल्लीत २६ जानेवारीला शेतकरी निदर्शकांनी केलेल्या हिंसाचारानंतर, या हिंसाचारासाठी शेतकरी नेते आंदोलनातील काही नेत्यांना दोष देत आहेत. अशाच नेत्यांपैकी एक आहे दीप सिद्धू. लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारा प्रकरणी दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये दीप सिद्धूचे नाव आहे. दीपने शेतकरी नेत्यांना ‘सिक्रेट’ उघड करण्याची धमकी दिली असून मी गुपित सांगायला सुरुवात केली, तर संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांना कुठे लपायच ते समजणार नाही, असे म्हटले आहे.

अभिनयाकडून सामाजिक कार्यकर्ता बनलेल्या दीप सिद्धूला शेतकरी ट्रॅक्टर मोर्चातील हिंसाचारासाठीही जबाबदार धरण्यात येते आहे. त्याच्यावर हिंसाचाराला चिथावणी दिल्याचा आरोप आहे. दीप सिद्धूने शेतकऱ्यांचे नेतृत्व केले आणि त्यांना लाल किल्ल्याकडे घेऊन गेला. शेतकऱ्यांची लाल किल्ल्याकडे जाण्याची अजिबात इच्छा नव्हती, असे शेतकरी नेते गुरनाम सिंह चाडूनी म्हणत आहेत. ‘स्वराज इंडिया’चे नेते योगेंद्र यादव यांनीही दीप सिद्धू याला लाल किल्ल्यावरील घटनेसाठी जबाबदार ठरवले आहे.

हिंसाचाराला चिथावणी देऊन शेतकरी आंदोलनाला बदनाम केल्याचा संयुक्त किसान मोर्चाने केलेला आरोप दीप सिद्धूने फेटाळून लावला. त्याने सोशल मीडियावरुन आपली बाजू मांडली. मी गुपित सांगायला सुरुवात केली, तर संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांना कुठे लपायच ते समजणार नाही, असे म्हणाला.

शेतकरी नेत्यांवर हल्ला करत सिद्धू म्हणाला – तुम्ही निर्लज्जपणे मला जबाबदार धरत आहात. तुमच्या निर्णयाच्या आधारावर लोक संकल्प करुन, ट्रॅक्टर मोर्चासाठी दिल्लीत आले होते. लोक तुमचा शब्द मानतात. लाखो लोक माझ्या नियंत्रणाखाली कसे राहू शकतात? मी लाखो लोकांना चिथावणी देऊ शकतो, मग तुमचे महत्त्व काय ? दीप सिद्धूला कोणी मानत नाही, त्याचे योगदान नाही. मग मी लाखो लोकांना घेऊन तिथे आलो, हे तुम्ही कसे म्हणू शकता? असा मी सिंघू सीमेच्या जवळच आहे, असे तो म्हणतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER