शरद पवारांच्या हस्ते कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाइकांसाठी फ्लॅट्सचं लोकार्पण

Sharad Pawar - Maharshtra Today

मुंबई :- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. राजेंद्र बडवे (Dr. Rajendra Badve) यांच्याकडे म्हाडाच्या १०० फ्लॅट्सच्या  चाव्या सोपवल्या. परळ येथील टाटा कॅन्सर रुग्णालयाजवळ कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना निवारा मिळावा यासाठी शरद पवार यांनी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना सूचना केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि जितेंद्र आव्हाड यांनी मोठा निर्णय घेत म्हाडाचे १०० फ्लॅट्स देण्याचा निर्णय घेतला होता.

राज्य सरकारने ३० एप्रिल रोजी परळ येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलला रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी १०० फ्लॅट्स उपलब्ध करून देण्याचे आदेश जारी केले होते. लालबागमधील हाजी कसम चाळ पुनर्विकास प्रकल्पातील प्रत्येकी ३०० चौरस फूट आकाराचे म्हाडाचे फ्लॅट्स रुग्णालयाला ३० वर्षांच्या कालावधीसाठी नाममात्र दराने दरवर्षी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Discalimer:-बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button