सांगली महापालिकेच्या आपत्तीमित्र अँपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्याहस्ते लोकार्पण

आता घरबसल्या नागरिकांना मिळणार महापुराची माहिती

MLA Sudhir Gadgil of Sangli Municipal Corporation's Apattimitra App

सांगली : सांगली महापालिकेने नागरिकांना संभाव्य महापूर किंवा अन्य कोणत्याही आपत्ती काळात उपयुक्त ठरणारे मोबाईल अँप तयार केले आहे. आपत्ती मित्र नावाच्या या अँपचे सोमवारी आमदार सुधीर गाडगीळ यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी महापौर गीता सुतार, आयुक्त नितीन कापडणीस, उपमहापौर आनंदा देवमाने,स्थायी सभापती संदीप आवटी, गटनेते युवराज बावडेकर आदी उपस्थिती होते.

या अँपमध्ये संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन सेवा तसेच महापुराबाबत सर्व माहिती मिळणार आहे. चांदोली, अलमट्टी धरणाच्या पाणी पातळी बरोबर विसर्गाची तातडीची माहितीही या अँपमध्ये मिळणार आहे. आपत्कालीन सेवा तसेच प्रशासनाच्या सूचना, महत्वाचे फोन नंबर,नियंत्रण कक्षाचे नंबरही यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. मागील महापुरामध्ये आलेल्या अनेक अडचणी आणि त्रुटींचा दखल घेऊन आयुक्त कापडणीस आणि प्रशासनाने हे अँप तयार केले आहे.

या अँपमुळे महापूर किंवा अन्य आपत्ती नागरिकांना वेळीच सावध करण्यासाठी आणि मदतीसाठी हे अँप उपयोगी पडेल, असा विश्वास यावेळी आमदार सुधीर गाडगीळ आणि महापौर गीता सुतार यांनी व्यक्त केला. तसेंच कोव्हिडची परिस्थिती हाताळण्यात आणि आता आपत्ती अँप चांगल्या रीतीने सुरू केल्याबद्दल आयुक्त नितीन कापडनीस आणी प्रशासनाचेही विशेष अभिनंदन करण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER