कोरोना: राज्यात कोरोनाच्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या घटली

Coronavirus Maharashtra Active Cases

मुंबई : राज्यातील कोरोनाच्या (Corona) ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या घटल्याची माहिती आजच्या दिवसभरातील आकडेवारीमधून समोर आली आहे. त्याचबरोबर रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. यावरुन राज्यात करोनाच्या संसर्गाचे काही प्रमाणात नियंत्रणात असल्याचे चित्र आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

या माहितीनुसार, राज्यात आज ४३०४ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर नव्याने ४६७८ करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे एकूण १७,६९,८९७ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ६१,४५४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९४.१ टक्के झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER