सोने दरात घसरण

Gold prices

कोल्हापूर : सोने (Gold) दरात तब्बल दोन हजार रुपयांची घसरण झाली. कोल्हापुरात (Kolhapur) 24 कॅरेटचा प्रतितोळा दर 50 हजार 600, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 46 हजार 550 वर आला. शंभर ते दोनशे रुपयांनी दरवाढ होणाऱ्या सोन्याचे भाव अचानक दोन हजार रुपयांनी घसरल्याने सराफ बाजारपेठेत सायंकाळी सोने खरेदीसाठी मोठी गर्दी वाढली. कोरोना काळात सोने दरात काही चढ-उतार होत होते.

पण गेल्या महिन्यात 24 कॅरेट सोन्याचा दर हा 58 हजार रुपये प्रतितोळा गेला होता. सोन्याच्या दरातील सततची वाढ ध्यानात घेऊन हे दर 70 हजार रुपये तोळा जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली होती; पण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींचा परिणाम होऊन सोने दरात सतत घसरण होत गेली. गेल्या काही दिवसांपासून सोने दरात अंशत: वाढ होत होती. दहा दिवसांपूर्वी 24 कॅरेट सोन्याचा प्रतितोळा भाव 52 हजार 400 रुपये होता. तर चांदी 63 हजार 300 रुपये किलो होती. यानंतर सोने दरात सतत वाढ होत गेली आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात 700 रुपये, तर चांदी दरात 2 हजार 900 रुपयांची वाढ झाली. 24 कॅरेट सोन्याचा दर 50 हजार 600, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 46 हजार 550 वर आला. दिवाळी सण व लग्नसराईत सोने दरात वाढ होईल, असा अंदाज बांधून ग्राहकांकडून सोने खरेदी केले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER