चिंताजनक : सोलापुरात मुलींच्या जन्मदरात घट

सोलापूर : सोलापूर (Solapur) जिल्ह्याचा यंदाच्या लिंग गुणोत्तर अहवालातील आकडेवारीनुसार गेल्या पाच वर्षांत यावर्षी पहिल्यांदाच मुलींच्या जन्मदरात घट झाली. एक हजार मुलांमागे 923 मुली असे यंदाचे मुलींचे प्रमाण असल्याची आकडेवारी आहे. 936 मुलींचे असलेले प्रमाण 923 वर आल्यामुळे स्त्रीभूण हत्याचे प्रमाण वाढले असल्याचे यातून स्पष्ट होते.

मागील पाच वर्षांच्या तुलनेत गतवर्षी प्रथमच एक हजार मुलांमागे 936 मुलींचे गुणोत्तर होते. त्यामुळे हळूहळू मुलांबरोबरीने मुलींचा जन्मदर येतोय, असा समज होता. परंतु यावर्षी मुलींच्या जन्मदरात घट झाल्यामुळे पुन्हा समाजाची मानसिकता वंशाचा दिवा मुलगाच, असा आट्टाहास करीत असल्याचे दिसत आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था या मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढले पाहिजे यासाठी विविध उपक्रम राबवित आहेत.

महत्त्वाचे म्हणजे जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागामार्फत ‘बेटी बचाओ, बेटी पढोओ‘ या माध्यमातून पालकांचे प्रबोधन केले जाते. तरीही मुलींच्या जन्मदरात बाबत सोलापूर पिछाडीवर जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER