लोकशाही संपल्याचे जाहीर करा; अन्यथा चंद्रकांत पाटलांनी न्यायालयाची माफी मागावी : नवाब मलिक

nawab malik - Chandrakant Patil - Maharashtra Today

मुंबई :- न्यायालयही चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्यानुसार काम करत असेल तर लोकशाही संपली असे जाहीर करा; नाही तर चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी न्यायालयाची माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केली आहे.

‘छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) तुम्ही जामिनावर बाहेर आहात, निर्दोष सुटलेले नाहीत, फार बोलू नका, नाही तर महागात पडेल.’ असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. यावर नवाब मलिक (Nawab Malik) यांनी चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर दिले. “चंद्रकांत पाटील अशा पद्धतीने बोलत असतील तर न्यायालयाने सुमोटो अंतर्गत कारवाई करावी. आजपर्यंत भाजपकडून यंत्रणांचा दुरुपयोग करण्यात येत आहे, हे सिद्ध झाले आहे. यात न्यायालयसुद्धा त्यांच्या बोलण्यावर काम करतेय का?” असा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला. छगन भुजबळ यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. परंतु चंद्रकांतदादांच्या बोलण्याचा अर्थ काय, अशी विचारणाही नवाब मलिकांनी केली आहे.

वारंवार कोणावर रागावणार?
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या धमकीची खिल्ली उडवली. “ममता बॅनर्जी या झाशीच्या राणीसारख्या एकहाती लढल्या. झाशीच्या राणीने मेरी झाशी नही दुंगी असे म्हटले होते. ममतादीदींनीही मेरा बंगाल नही दुंगी असे म्हटले. माझ्या या विधानावर रागावण्यासारखे काय आहे? आता पराभव सहन करायला हवा. वारंवार फटके बसल्यावर तुम्ही किती लोकांवर रागावणार आहात?” असा चिमटाही भुजबळांनी काढला.

ही बातमी पण वाचा : भाजप नेत्यांचा ‘उद्धटपणा’ हे बंगलाच्या पराभवाचे कारण, महाराष्ट्रातील सदैव गुरगुरणाऱ्या लोकांनी याचे भान ठेवावे ;  शिवसेनेचा टोला 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button