
नवी दिल्ली : काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी वाढत्या इंधन दरवाढीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर टीकास्त्र सोडले. ज्या दिवशी पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे दर वाढणार नाहीत. तो दिवस ‘अच्छे दिन’ म्हणून घोषित करा, अशी टीका त्यांनी केली आहे.
प्रियांका गांधी यांनी ट्विट करून वाढत्या पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. आठवडाभरात पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाले, त्यादिवशी भाजपा सरकारचे ‘अच्छे दिन’ म्हणून जाहीर केले पाहिजे. या महागाईमुळे सर्वसामान्याचे प्रत्येक दिवस ‘महंगे दिन’च आहे. सोबतच ट्विट पोस्टमध्ये नवी दिल्ली आणि मुंबईतील पेट्रोल-डिझेलचे भाव व इंधन दरवाढीचा अकरावा दिवस असल्याचे दर्शवले आहे.
शेतकरी आणि सरकारमधल्या बैठका निष्फळ
आतापर्यंत सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये चर्चेच्या ११ फेऱ्या झाल्या. अद्याप आंदोलनावर कोणताही तोडगा निघालेला नाही. दुसरीकडे चर्चेतून मार्ग काढण्यासाठी शेतकरी संघटना आणि सरकार दोन्ही तयार आहेत. गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आंदोलनावर कोणतीही चर्चा पुढे सरकलेली नाही. शेतकरी आंदोलक कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहेत.
२०० हून अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू
केंद्र सरकारचे कृषी कायदे रद्द करण्यात यावेत, या मागणीसाठी शेतकरी अजूनही दिल्ली सीमेवर बसले आहेत. अडीच महिन्यांपासून शेतकरी आपल्या मागण्यांसाठी कोणताही विचार न करता लढत आहे. या लढाईत २०० हून अधिक शेतकऱ्यांना प्राण गमवावे लागले. मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटायचे नाही, असा निर्धार शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर उन्हाळ्यात आंदोलन टिकवण्यासाठी एसी आणि कुलरची व्यवस्था करावी. यासाठी सरकारने विजेचा पुरवठा करावा, अशी मागणी राकेश टिकैत यांनी केली आहे.
भाजपा सरकार को सप्ताह के उस दिन का नाम ‘अच्छा दिन’ कर देना चाहिए जिस दिन डीजल-पेट्रोल के दामों में बढ़ोत्तरी न हो।
क्योंकि महंगाई की मार के चलते बाकी दिन तो आमजनों के लिए ‘महंगे दिन’ हैं। pic.twitter.com/JmssmGR5d2
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) February 20, 2021
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला