उद्धव ठाकरे, अन्वय नाईक कुटुंबीयांसोबतचे संबंध जाहीर करा; किरीट सोमय्या यांचे आव्हान

- दोन्ही कुटुंबांचे जमिनीचे २१ व्यवहार केले उघड

Kirit Somaiya -CM Uddhav Thackeray

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि अन्वय नाईक (Anvay Naik ) यांच्या कुटुंबात जमिनीचे २१ व्यवहार झाल्याचा दावा भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला. किरीट सोमय्या यांनी पत्रपरिषदेत जमिनीचे व्यवहार झाल्याचे कागदपत्र सादर केली व उद्धव ठाकरे यांनी अन्वय नाईक कुटुंबीयासोबत नेमके काय संबंध आहेत हे जाहीर करावे, अशी मागणी केली.

सोमय्या म्हणालेत – २१ सातबारा उतारे आम्ही शोधून काढले आहेत. यामध्ये जमिनीचे व्यवहार झाले आहेत. असे किती व्यवहार उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक कुटंबाचे झाले आहेत? जमिनी घ्यायच्या आणि विकायच्या हा उद्धव ठाकरेंचा व्यवसाय आहे का? रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे की ही गुंतवणूक आहे, ही माहिती आम्हाला हवी आहे.

काहीही संबंध नसणारी दोन कुटुंब एकत्र येतात आणि जमिनीचे आर्थिक व्यवहार करतात, पत्नीच्या नावे. याच्या मागचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न मी कालपासून करत आहे. मला कुणी समजावून सांगणार का? रश्मी ठाकरे आणि मनीषा रविंद्र वायकर यांच्यातही काय संबंध आहे? एकत्र येण्यामागचे प्रयोजन काय हा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे. तुम्ही सामान्य नागरिक नाही तर मुख्यमंत्री आहात म्हणून हे प्रश्न विचारत आहोत, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचे इतर काही व्यवहार आहेत हे महाराष्ट्राची जनता समजू शकते. ते मित्र, नातेवाईक असू शकतात… पण आम्हाला त्याबद्दल सांगा. शेतजमिनीचा व्यवहार झाला की राज्यातील जनतेच्या लोकांचाय मनात अनेक शंका निर्माण होतात,” असा उपहातात्मक टोमणाही सोमय्या यांनी मारला.

“रेवदंडामध्ये माझ्या सासूरवाडीपासून थोड्या अंतरावर जमीन असल्याने मला याबद्दल माहिती आहे. मी यासंबंधी तलाठी, तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्याशी बोललो. रायगडचे एस. पी. जे अन्वय प्रकऱणाचा फेरतपास करत आहेत ते आर्थिक व्यवहार झाल्याचे माहिती नाही, असे सांगतात! जिल्हाधिकारी आरटीआय करा माहिती काढतो सांगतात, असे सोमय्या यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER