नेपाळला हिंदू राष्ट्र घोषित करा, मागणीसाठी आंदोलन

Declare Nepal a Hindu Nation again, agitation for demand

काठमांडू : नेपाळला पुन्हा हिंदू राष्ट्र (Hindu Nation)घोषित करा, या मागणीसाठी नेपाळमध्ये अनेक ठिकाणी आंदोलन सुरू झाले आहे. लोक रस्त्यावर उतरले आहेत. पंतप्रधान के. पी. ओली शर्मा (K. P. Oli Sharma) यांच्या विरोधात नागरिकात नाराजी वाढली आहे.

आंदोलकांनी नेपाळमधील सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांबाबत संताप व्यक्त केला आहे. नेपाळला पुन्हा हिंदू राष्ट्र घोषित करुन देशात राजेशाही लागू करा, अशी निदर्शकांची मागणी आहे. (Nepal citizens protest for demanding nation as Hindu rashtra )

निदर्शकांनी आरोप केला की, देशातील राजकीय नेते, पक्ष त्यांची जबाबदारी विसरले आहेत. देशात राजेशाही व्यवस्था लागू करा, अशी मागणी नेपाळच्या विश्व हिंदू महासंघ, शैव सेना नेपाळ, राष्ट्रीय सरोकार मंच, गोरक्षनाथ नेपाळ या संघटनांनी केली आहे.

राष्ट्रीय शक्ती नेपाळचे अध्यक्ष केशव बहादूर बिस्टा यांनी, नेपाळमध्ये संविधानिक राज्यपद्धती जाहीर करा. नेपाळला हिंदू राष्ट्र घोषित करा आणि संघीय राज्यपद्धत रद्द कर, अशा मागण्या केल्या आहेत. सध्याच्या के. पी. शर्मा ओली यांच्या सरकारने सामान्य जनतेला संकटात ढकलले आहे, असा आरोप बिस्टा यांनी केला.(Nepal citizens protest for demanding nation as Hindu rashtra )

२००८ मध्ये झाला होता राजेशाहीचा शेवट

नेपाळनं २००८ मध्ये २४० वर्षे जुनी राजेशाही रद्द करुन लोकशाही शासनव्यवस्था स्वीकारली होती. २०१५ मध्ये नेपाळमध्ये नवे संविधान बनवण्यात आले. त्यानंतर नेपाळला ‘लोकशाही संघराज्य प्रजासत्ताक’ घोषित करण्यात आले. २०१७ मध्ये नेपाळमध्ये निवडणुका झाल्या. मार्क्सवादी पक्ष सत्तेत आला. निदर्शक पृथ्वी नारायण शाह यांच्या छायाचित्राचे फलक घेऊन आंदोलन करत होते. पृथ्वी नारायण शाह हे १८ व्या शतकातील आधुनिक नेपाळचे संस्थापक होते. (Nepal citizens protest for demanding nation as Hindu rashtra)

१२ वर्षात ११ पंतप्रधान

पृथ्वी नारायण शाह यांनी १७६५ मध्ये नेपाळच्या एकत्रीकरणाची मोहीम हाती घेतली होती. १७६८ मध्ये गोरखा राजाने ‘किंग्डम ऑफ नेपाळ’ची स्थापना केली. त्यानंतर शाह वंशातील पाचवे राजे राजेंद्र विक्रम शाह याच्या कार्यकाळात ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने नेपाळच्या सींमावरील काही भागांवर कब्जा केला. यादरम्यान राजांमधील गटबाजी वाढली आणि यामुळे देशात लोकशाही व्यवस्था लागू करण्यासाठी लोकांनी आंदोलन केली. नेपाळमध्ये २००८ साली २४० वर्षांची राजेशाही संपुष्टात येऊन लोकशाही राज्य पद्धत लागू झाली. यानंतर दोन वेळा नेपाळचे संविधान बदलण्यात आले. नेपाळमध्ये पंतप्रधानांचा कार्यकाळ फारच कमी राहिला. लोकशाही लागू लागू झाल्यानंतर नेपाळ मध्ये १२ वर्षात ११ पंतप्रधान झाले आहेत. (Nepal citizens protest for demanding nation as Hindu rashtra )

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER